-

तुम्हाला जर कॉम्पुटर आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आवड असेल तर चॅटबॉट हा शब्द नक्की माहीत असेल. (Photo : Unsplash)
-
चॅटबॉट एक कॉम्पुटर प्रोग्राम आहे. चॅटबॉट ला साध्या भाषेत म्हणायचे झाले तर तो एक रोबोट असतो, ज्याचा वापर आपण संभाषणासाठी करतो. . (Photo : Unsplash)
-
मुख्यत: सेवा व उत्पादन देणार्या कंपन्या आणि ग्राहकांदरम्यान संवाद साधण्या साठी चॅटबॉट मोठ्या प्रमाणावर उपयोगी पडतो. याला ऑटो रिप्लायर देखील म्हटलं जातं. . (Photo : Unsplash)
-
व्हॉट्सअॅपवरील या चॅटबॉट्सचा वापर करून, तुम्ही भाज्या ऑर्डर करू शकता, तुमचा मासिक पाळीचा मागोवा घेऊ शकता आणि फ्लाइट असिस्टन्स देखील मिळवू शकता. हे चॅटबॉट्स तुमच्या फोनमधील जागा देखील वाचवतात.
-
ग्रोसरी ऑर्डर : तुम्ही भाज्या, खाद्यपदार्थ, किराणा सामान ऑर्डर करण्यासाठी JioMart चॅटबॉटची मदत घेऊ शकता. तुम्हाला फक्त 7977079770 हा नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह करायचा आहे आणि व्हॉट्सअॅपवर ‘हाय’ असा मजकूर पाठवायचा आहे. यानंतर तुम्हाला संपूर्ण कॅटलॉग मिळेल, ज्यामधून तुम्ही खरेदी करू इच्छित असलेल्या वस्तू निवडू शकता. (Image Source: Haptik)
-
फ्लाइट असिस्टन्स: WhatsApp वर तुमच्या फ्लाइट सहाय्याबद्दल अपडेटसाठी तुम्ही इंडिगो – 7428081281 किंवा एअर इंडिया चॅटबॉट – 9154195505 सेव्ह करू शकता. इन चॅट असिस्टंस, फ्लाइटचा स्टेटस, वेब चेक-इन कर यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. तुम्ही थेट व्हॉट्सअॅपवरून फ्लाइट बुक करू शकता.
-
ट्रेनमध्ये फूड डिलिव्हरी: जर तुम्ही अनेकदा ट्रेनने प्रवास करत असाल तर हा नंबर – 7042062070 WhatsApp वर सेव्ह करा. फूड ऑर्डरिंग ट्रेनमध्ये फूड ऑर्डर करण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. तुम्हाला फक्त तुमचा पीएनआर नंबर, आसन क्रमांक टाकायचा आहे आणि रेस्टॉरंट निवडा. मग तुमचा आवडता पदार्थ तुमच्या सीटवर येईल. (Source: YouTube Screenshot)
-
पीरियड ट्रॅकिंग: या चॅटबॉटचा वापर करून महिला त्यांच्या मासिक पाळी ट्रॅक करू शकतात. तुम्हाला फक्त ९७१८८६६६४४ वर ‘हाय’ मजकूर लिहायचा आहे आणि वेळेची प्राथमिक माहिती द्यावी लागेल. एकदा ते सेट झाल्यानंतर, महिलांना त्यांच्या मासिक पाळीबद्दल अलर्ट मेसेज मिळतो.
-
कॅब बुक: तुम्ही हा नंबर वापरून थेट व्हॉट्सअॅपवरून उबेर कॅब बुक करू शकता – 7292000002. तुम्हाला फक्त दिलेल्या नंबरवर ‘हाय’ पाठवायचे आहे आणि तुमचा Uber आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करायचे आहे. यानंतर, तुम्ही तुमचे पिकअप आणि ड्रॉप-ऑफ लोकेशन करून उबेर बुक करू शकता. चॅटमध्ये तुम्हाला भाड्याची माहिती तसेच ड्रायव्हरची माहिती मिळेल.
Whatsapp चे हे चॅटबॉट्स तुमच्या उपयोगाचे ठरतील; वेळेची बचत आणि चुटकीसरशी काम पूर्ण करेल
व्हॉट्सअॅपवरील या चॅटबॉट्सचा वापर करून, तुम्ही भाज्या ऑर्डर करू शकता, तुमचा मासिक पाळीचा मागोवा घेऊ शकता आणि फ्लाइट असिस्टन्स देखील मिळवू शकता. हे चॅटबॉट्स तुमच्या फोनमधील जागा देखील वाचवतात.
Web Title: Whatsapp chatbots for grocery order periods tracking food delivery in train cab book prp