• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. mobile best smartphone for diwali gift for parents and friends under 10000 prp

Diwali 2022 Gift Ideas : दिवाळीला गिफ्ट देण्यासाठी १० हजारपेक्षा कमी किमतीचे ‘हे’ खास स्मार्टफोन्स !

जर तुम्हीही दिवाळीला स्मार्टफोन गिफ्ट करण्याचा विचार करत असाल तर हे आहेत स्वस्त आणि मस्त पर्याय.

Updated: October 13, 2022 19:31 IST
Follow Us
  • आता संपूर्ण देशभरात दिवाळीची धूम सुरू आहे. अवघ्या एक आठवड्यावर दिवाळी येऊन ठेपली आहे.
    1/12

    आता संपूर्ण देशभरात दिवाळीची धूम सुरू आहे. अवघ्या एक आठवड्यावर दिवाळी येऊन ठेपली आहे.

  • 2/12

    दिवाळीच्या दिवशी नवी वस्तू घेण्याची-देण्याची प्रथा फार जुनी आहे.

  • 3/12

    दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने तुमचं एक गिफ्ट तुमच्या पालकांच्या किंवा मित्रांच्या चेहऱ्यावर स्माईल आणू शकते. (Photo credit: Pixabay)

  • 4/12

    डिजिटल आणि सोशल मीडियाच्या युगात भेटवस्तूंसाठी स्मार्टफोन हा एक चांगला पर्याय आहे.

  • 5/12

    ई कॉमर्स साईट्सवर देखील स्मार्टफोन्सवर खास ऑफर्स चालू आहेत.

  • 6/12

    आज आम्‍ही तुम्‍हाला १० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत पाच बेस्ट स्‍मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत.

  • 7/12

    जर तुम्हीही दिवाळीला स्मार्टफोन गिफ्ट करण्याचा विचार करत असाल तर हे आहेत स्वस्त आणि मस्त पर्याय.

  • 8/12

    Lava Blaze 5G : तुम्ही 5G कनेक्टिव्हिटीसह फोन गिफ्ट करण्याचा विचार करत असाल तर Lava Blaze 5G हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. हा फोन १० हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल, दिवाळीपासून या फोनची विक्री सुरू होणार आहे. तसंच हा भारतातील सर्वात कमी किमतीचा 5G फोन आहे. Lava Blaze 5G मध्ये ६.५ इंचाचा HD+ IPS डिस्प्ले आणि ९०Hz चा रिफ्रेश रेट आहे. Lava Blaze 5G मध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर आणि ५००० mAh बॅटरी आहे. याशिवाय Lava Blaze 5G मध्ये तीन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत, ज्यामध्ये प्रायमरी लेन्स ५० मेगापिक्सेलचा आहे. फोनच्या पुढील बाजूस ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. (Image credit: Lava)

  • 9/12

    Realme C30 फोन देखील जवळपास ६ हजारांच्या किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. फोनमध्ये ६.५ इंचाचा HD Plus डिस्प्ले आणि Unisoc T612 प्रोसेसर आहे. फोनमध्ये ३ GB पर्यंत RAM + ३२ GB पर्यंत स्टोरेज आहे. कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. (Image Source: Realme)

  • 10/12

    Samsung Galaxy F13 देखील १० हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. Samsung Galaxy F13 मध्ये मोठी बॅटरी, बेस्ट डिस्प्ले आणि सुपरफास्ट प्रोसेसरसह अनेक फीचर्स आहेत. फोनमध्ये ६० Hz रिफ्रेश रेटसह ६.६० इंचाचा डिस्प्ले आहे. हे Exynos ८५० प्रोसेसरसह ६ GB RAM + १२८ GB पर्यंत स्टोरेज मिळते. फोनमध्ये ६००० mAh बॅटरी आणि ५० मेगापिक्सेल कॅमेरा आहे. (Image Source: Samsung)

  • 11/12

    Redmi A1 फोन ६ हजारांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे. मल्टीमीडिया, फोन, मेसेज आणि सोशल मीडिया वापरणाऱ्यांसाठी Redmi A1 हा बेस्ट ऑप्शन आहे. फोनमध्ये १२०Hz च्या टच सॅम्पलिंग रेटसह ६.५२ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. Redmi A1 सोबत MediaTek Helio A22 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात २ GB रॅम + ३२ GB स्टोरेज आहे, जे मेमरी कार्डच्या मदतीने ५१२ GB पर्यंत वाढवता येते. (Image Source: Redmi)

  • 12/12

    Moto G31 ची किंमत १२,९९९ रुपये आहे, परंतु आता हा फोन १०,४९९ रुपयांच्या किंमतीला लिस्ट करण्यात आला आहे. फोनमध्ये ६.४ इंचाचा AMOLED डिस्प्ले आणि MediaTek Helio G85 प्रोसेसर आहे. फोनमध्ये ६ GB पर्यंत RAM + १२८ GB पर्यंत स्टोरेज आहे. तसेच, फोनमध्ये तीन मागील कॅमेरे आहेत, ज्यामध्ये प्रायमरी लेन्स ५० मेगापिक्सेल, दुसरी लेन्स ८ मेगापिक्सेल वाइड अँगल आणि तिसरी लेन्स २ मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर आहे. समोर १३ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

TOPICS
तंत्रज्ञानTechnology

Web Title: Mobile best smartphone for diwali gift for parents and friends under 10000 prp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.