-
Infinix Zero Ultra : नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या सुरुवातील हा फोन लाँच होऊ शकतो. या फोनची किंमत ४२ हजार ४०० रुपये आहे. फोनमध्ये ६.८ इंचचा ३ डी कव्हर्ड एमोलेड डिस्प्ले मिळतो. फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोअरेज मिळते. सुरक्षेसाठी फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये २०० मेगापिक्सेलचा कॅमेरा असून सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. (source – infinix)
-
OnePlus Nord 3 : हा फोन नोव्हेंबरमध्ये लाँच होऊ शकतो, फोनमध्ये ४५०० एमएएच बॅटरीसह १५० वॉटचा सुपर फ्लॅश चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो. फोनमध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी पर्यंतची स्टोअरेज मिळू शकते. फोनमध्ये ५० मेगापिक्सेल ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. (source – indian express)
-
Sony Xperia 5 IV 5G : हा फोन २४ नोव्हेंबरला लाँच होऊ शकतो. युरोपियन व्हेरिएंटमध्ये ६.१ इच फुल एचडी प्लस ओएलईडी डिस्प्ले मिळतो. फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोअरेजसह ५ हजार एमएएचची बॅटरी मिळते. फोनची ८० हजार रुपयांमध्ये उपलब्ध होऊ शकतो. (source – sony)
-
VIVO Y73T : या फोनमध्ये १२ जीबीची रॅम आणि २५६ जीबीची स्टोअरेज मिळते. फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. सेल्फिसाठी ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ६ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. (source – jansatta)
-
Xiaomi 12S Ultra : हा फोन नोव्हेंबर महिन्यात भारतात लाँच होणार. चायना व्हेरिएंटमध्ये ६.७३ इंच २ के एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ प्लस जेन १ प्रोसेसरसोबत १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबीची स्टोअरेज मिळत आहे. (source – mi)
-
फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि ३२ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. फोनची किंमत ७० हजार ७०० रुपये आहे. (source – mi)
नोव्हेंबरमध्ये लाँच होणार ‘हे’ जबरदस्त 5G स्मार्टफोन्स, जाणून घ्या फीचर आणि किंमत
नोव्हेंबर महिन्यात काही दमदार ५ जी स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत. तुम्ही ५ जी फोन घ्यायचा विचार करत असाल तर हे फोन्स चांगला पर्याय ठरू शकतात.
Web Title: 5g smartphones that will launch in november 2022 ssb