-
देशात 5G सेवा लाँच झाली असून आता ॲपल (Apple) कंपनीने काही आयफोन मॉडेल्ससाठी नवीन 5G अपडेट जारी केलं आहे.
-
ॲपल कंपनीची सध्या ही सेवा काही ठराविक मॉडेल्ससाठी मर्यादित आहे.
-
हे अपडेट सध्या आयफोन 14, आयफोन 13, आयफोन 12 आणि आयफोन SE या मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. कंपनीच्या या नव्या अपडेटमुळे या एअरटेल आणि जीओ युजर्सना त्यांच्या आयफोनमध्ये 5G नेटवर्क वापरता येणार आहे.
-
भारतातील आयफोन बीटा युजर्सनाही आता 5G सेवेचाही लाभ घेता येईल.
-
iPhone 14, iPhone 13, iPhone 12 आणि iPhone SE मॉडेल आणि iOS 16 बीटा वापरणाऱ्या आयफोन युजर्सना मोबाईलमधील सेटिंग्समध्ये बदल करुन 5G सेवा वापरता येईल.
-
यासाठी तुमच्या iPhone च्या सेटिंग्जमध्ये जाऊन अपडेट तपासा.
-
तुमच्या फोनमध्ये अपडेट आलं असल्यास, ते डाउनलोड करा.
-
यानंतर तुमच्या फोनवर beta.apple.com/profile वर जा.
-
एकदा डाउनलोड केल्यानंतर Install पर्यायावर क्लिक करा.
-
यानंतर, सेटिंगमध्ये जाऊन, जनरल व्हीपीएन आणि नंतर डिव्हाइस मॅनेजमेंट पर्यायावर जाऊन iOS 16 बीटा वर क्लिक करा.
-
अशा प्रकारे बीटा वर्जन तुमच्या आयफोनच्या सेटिंग अॅपमध्ये उपलब्ध होईल
-
तुमच्या शहरात 5G सेवा सुरु झाली असेल तर तुम्ही तुमच्या iPhone वर 5G नेटवर्कशी कनेक्ट करू शकता.(Photo- indianexpress )
Photos: How to activate 5G in iPhone: आयफोन वापरकर्त्यांसाठी खुशखबर! आता तुमच्या स्मार्टफोनवर मिळवा 5G सेवा, फॉलो करा ‘या’ स्टेप्स
5G in iPhone: अॅपलने भारतात आपल्या iPhone वापरकर्त्यांसाठी 5G बीटा अपडेट आणण्यास सुरुवात केली आहे. ॲपल कंपनीने काही आयफोन मॉडेल्ससाठी नवीन 5G अपडेट जारी केलं आहे. आयफोन युजर्सना मोबाईलमधील सेटिंग्समध्ये काही बदल करुन ही 5G सेवा वापरता येईल. यासाठी तुम्हाला खालील काही सोप्या स्टेप्स, फॉलो करावे लागणार आहे.
Web Title: Get 5g service on iphone smartphone follow these steps pdb