-
सेल्फीला आकर्षक करण्यासाठी आपण विविध फिल्टर्स वापरतो, इन्स्टाग्राम किंवा इतर फोटो एडिटिंग अॅपचा वापर करतो. (source – pixabay)
-
अलीकडे prisma Lensa ai नावाचे अॅप व्हायरल झाले आहे. (source – pixabay)
-
prisma Lensa ai अॅप तुमच्या सेल्फीला कलाकृतीमध्ये रुपांतरीत करते. (source – pixabay)
-
अॅपद्वारे सादर झालेल्या सेल्फी सुंदर आणि लक्षवेधक अशा पेटिंग स्वरुपात युजरला मिळतात. (Image source: Shruti Dhapola via Lensa AI)
-
हे अॅप असे अफलातून फोटो कसे तयार करते? याबाबत जाणून घेऊया. (Image source: Shruti Dhapola via Lensa AI)
-
लेन्सा एआय हे प्रिझ्मा लॅबचे उत्पादन असून ते तुमच्या सेल्फीवर आधारीत भन्नाट अवतार तुमच्यासाठी तयार करते. (Image source: Shruti Dhapola via Lensa AI)
-
लेन्सा फोटोला पेंटिंगमध्ये रुपांतरित करते किंवा ते तुम्हाला कॉस्मिक लूकमध्ये देते, किंवा तुम्हाला फॅन्टसी लूक देते. विशेष म्हणजे, कोणतेही अवतार सारखे नसते. (Image source: Shruti Dhapola via Lensa AI)
-
अॅप उघडल्यानंतर मॅजिक अवतारचा पर्याय दिसेल त्यावर टॅप करा. टॅप केल्यावर तुम्हाला १० ते २० सेल्फी अपलोड करण्यासाठी विचारले जाईल, जेणेकरून एआय अल्गोरिदम अनोखे छायाचित्र तयार करेल. (Image source: Shruti Dhapola via Lensa AI)
-
फोटो अपलोड केल्यानंतर तुम्ही तुमचे जेंडर (पुरुष किंवा स्त्री) निवडू शकता आणि नंतर अवतार तयार करण्यासाठी क्रिएटवर टॅप करा. (Image source: Shruti Dhapola via Lensa AI)
-
मात्र, काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. सेल्फीमध्ये तुमचा चेहरा फोकसमध्ये असायला हवा. चेहरा अर्धा झाकलेला नसावा. चांगल्या छायाचित्रासाठी चेहऱ्यावर शार्प फोकस असणे गरजेचे आहे. (Source – prisma-ai)
-
या सेवेसाठी तुम्हाला पैसे मागितले जातील. पैसे दिल्यानंतर प्रक्रिया सुरू होते जी १५ मिनिटे चालते आणि नंतर अवतार तयार होतात. (Image source: Shruti Dhapola via Lensa AI)
-
तुम्ही वर्षभरासाठीचे ४९९९ रुपयांचे वार्षिक सब्सक्रिप्शन घेऊ शकता. सध्या ५० टक्के सूट मिळत आहे. ज्यामुळे त्याची किंमत २४९९ रुपये झाली आहे. तुम्हाला एक आठवड्याचा मोफत ट्रायल देखील मिळतो. (Image source: Shruti Dhapola via Lensa AI)
तेच ते फिल्टर वापरून कंटाळा आलाय का? मग LENSA वापरा ना, सेल्फीला मिळणार आकर्षक लूक, पाहा फोटो
अलीकडे prisma Lensa ai नावाचे अॅप व्हायरल झाले आहे. हे अॅप तुमच्या सेल्फीला कलाकृतीमध्ये रुपांतरीत करते.
Web Title: What is lensa ai and how it is used ssb