• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. apple now enters retail stores after iphone india first store to be set up in mumbai bkc city vrd

PHOTOS: Apple ची आयफोननंतर आता रिटेल स्टोअरमध्ये एन्ट्री; ‘या’ शहरात उभे राहणार भारतातील पहिले स्टोअर

Apple ने भारतात आपले पहिले रिटेल स्टोअर उघडण्याचे सूतोवाच केले आहेत. अ‍ॅपलचे भारतातील पहिले स्टोअर जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉल मुंबईत सुरू होणार आहे.

Updated: April 5, 2023 20:43 IST
Follow Us
  • Apple store bkc 1
    1/24

    आयफोन म्हटलं की डोळ्यासमोर येते ती अॅपल कंपनी. परंतु आता अॅपल कंपनी आयफोननंतर रिटेल स्टोअरमध्ये उतरणार आहे. (सर्व छायाचित्र : प्रदीप दास)

  • 2/24

    Apple ने भारतात आपले पहिले रिटेल स्टोअर उघडण्याचे सूतोवाच केले आहेत. अ‍ॅपलचे भारतातील पहिले स्टोअर जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉल मुंबईत सुरू होणार आहे.

  • 3/24

    मुंबईच्या अ‍ॅपल स्टोअरच्या भिंतींवर मुंबईच्या काळी -पिवळी टॅक्सी कलेतून प्रेरित पेंटिंग्ज साकारण्यात येणार आहेत. याशिवाय अ‍ॅपल बीकेसी क्रिएटिव्हमध्ये अ‍ॅपलची अनेक उत्पादने आणि सेवा देखील कोरल्या जातील.

  • स्टोअरचे क्रिएटिव्ह “हॅलो मुंबई” या क्लासिक अ‍ॅपल टॅगलाइनअंतर्गत तुमचे स्वागत करण्यात येणार आहे.
  • 4/24

    Apple च्या पहिल्या स्टोअरचा अनुभव वापरकर्ते Apple BKC वॉलपेपर डाउनलोड करून घेऊ शकतात. यामध्ये तुम्हाला स्पेशल साउंड आणि Apple म्युझिकची प्ले-लिस्ट मिळणार आहे.

  • 5/24

    भारतीय बाजारपेठेमध्ये Apple कंपनी आपले पहिले फ्लॅगशिप रिटेल स्टोअर उघडणार आहे. पुढील माहिन्यात हे पहिले फ्लॅगशिप स्टोअर मुंबईमध्ये उघडण्यात येणार आहे.

  • 6/24

    त्यानंतर दुसरे फ्लॅगशिप रिटेल स्टोअर हे राजधानी दिल्लीमध्ये उभारले जाणार आहे. भारतामध्ये सध्या Apple चे फक्त ऑनलाईन स्टोअर उपलब्ध आहे.

  • 7/24

    इतर स्टोअर्स हे कंपनीचे अधिकृत स्टोअर्स आहेत. Apple चे मुंबईतील स्टोअर रिलायन्स इंडस्ट्रीच्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये उभारण्यात येणार आहे. हे स्टोअर या मॉलमध्ये २२ हजार स्केअरफूटमध्ये उभे राहणार आहे.

  • 8/24

    मुंबईचे स्टोअरही न्यूयॉर्क, बीजिंग आणि सिंगापूरसारख्या अ‍ॅपलच्या स्टोअरसारखेच असणार आहे.

  • 9/24

    Apple चे भारतातील दुसरे फ्लॅगशिप स्टोअर राजधानी दिल्ली येथे उभारण्यात येणार आहे हे स्टोअर सिटीवॉक मॉल इथे उभारले जणार आहे.

  • 10/24

    ही स्टोअर १०,००० ते १२,००० स्क्वेअरफूटमध्ये उभारले जाणार आहे. या स्टोअरचे लॉन्चिंग एप्रिल ते जून या महिन्यामध्ये दरम्यान होणार आहे.

  • 11/24

    Apple ची पुरवठादार Foxconn कंपनीला एअरपॉड्स तयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे.

  • 12/24

    फॉक्सकॉन हा जगातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स कॉन्ट्रॅक्टर आहे, जो ७०% आयफोन बनवतो. आता कंपनीला प्रथमच एअरपॉडचे कंत्राट मिळाले आहे.

  • 13/24

    फॉक्सकॉन ही कंपनी या निमित्ताने भारतामध्ये $२०० दशलक्ष म्हणजेच सुमारे १,६५५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

  • 14/24

    फॉक्सकॉन कंपनीसह Wistron Corp आणि Pegatron Corp सारख्या कंपन्या देखील भारतात Apple ची उत्पादने तयार करत आहेत.

  • 15/24

    फॉक्सकॉनच्या नवीन प्लांटमधील उत्पादन हे २०२४ च्या अखेरीस सुरू होऊ शकते.

  • कंपनी भारतात इअरफोन्स तयार करण्यासाठी भारतामध्ये कारखाना तयात करण्याची योजना तयार करत आहे. याच्याशी संबंधित दोन लोकांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे.
  • 16/24
  • 17/24
  • 18/24
  • 19/24
  • 20/24
  • 21/24
  • 22/24

Web Title: Apple now enters retail stores after iphone india first store to be set up in mumbai bkc city vrd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.