-
जर तुमचा एखादा खाजगी फोटो किंवा व्हिडीओ तुमच्या परवानगीशिवाय इंटरनेटवर दिसत असेल तर ही अडचणीची बाब ठरू शकते. (फोटो – freepik)
-
पण असं काही झालं असेल तर काळजी करण्याची गरज नाही, कारण तुम्ही असा फोटो किंवा व्हिडीओ इंटरनेटवरून सहज हटवू शकता, त्यासाठी आवश्यक पद्धत आपण जाणून घेणार आहोत. (फोटो – freepik)
-
वेबसाईट किंवा अपलोड करणाऱ्याशी संपर्क करा
जर तुमचा फोटो, व्हिडीओ अशा वेबसाईटवर असेल ज्यावर तुमचे नियंत्रण नाही, तर थेट त्या प्लॅटफॉर्मच्या मालकाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करा. त्यासंबंधीत माहितीसाठी WHOIS टूल वापरा आणि त्यांना तुमची परिस्थिती समजावून द्या. (फोटो – freepik) -
इन-प्लॅटफॉर्म रिपोर्टिंग वापरा
इंस्टाग्राम, फेसबुक, एक्स (पूर्वीचे ट्विटर) किंवा यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर, त्यांच्या इन-प्लॅटफॉर्म रिपोर्टिंग फिचरचा वापर करा. बहुतेक प्लॅटफॉर्मवर छळ, फसवणूक आणि पोर्नोग्राफी इत्यादींच्या विरोदात स्पष्ट धोरणे ठरवण्यात आलेली आहेत. (फोटो – freepik) -
आवश्यकता वाटल्यास कठोर पावले उचला
जर एखादा प्लॅटफॉर्म तुम्हाला प्रतिसाद देत नसेल तर रिपोर्ट हार्मफुल कंटेन्ट (यूकेतील संस्था, पण जागतिक स्तरावर मान्य) सारख्या संघटना पुढील कारवाईसाठी तुम्हाला आवश्यक मार्गदर्शक सूचना आणि मदत देऊ शकतात. (फोटो – freepik) -
सायबर तज्ञ आणि ‘द ऑर्गनायझेशन फॉर एनलाईटनमेंट अँड एज्युकेशन’ (TOFEE) चे सह-संस्थापक तुषार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही आक्षेपार्ह कंटेन्ट थेट संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिपोर्ट करू शकता. आयटी नियम, २०२१ आणि सुधारणा नियम २०२३ नुसार, सर्व प्लॅटफॉर्म्सना एक तक्रार अधिकारी नियुक्त करणे आवश्यक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या अधिकाऱ्याला २४ तासांच्या आत तक्रारीची दखल घ्यावी लागेत आणि १५ दिवसांच्या आत त्याच्यावर कारवाई करावी लागते. (फोटो – freepik)
-
तुषार शर्मा यांनी पुढे सांगितले की, काही प्रकरणांमध्ये, जसे की संवेदनशील किंवा हानिकारक कंटेन्टशी संबंधित तक्रारी या ७२ तासांच्या आत सोडवल्या गेल्या पाहिजेत. जर तुम्हाला चाइल्ड पोर्नोग्राफी, सायबरबुलिंग, ऑनलाइन छळ किंवा महिलांना लक्ष्य करत होणाऱ्या गुन्ह्यांचा सामना करावा लागत असेल, तर तुम्ही सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल (https://www.cybercrime.gov.in.) वर तक्रार दाखल करू शकता. सहयोग पोर्टल देखील नागरिकांच ऑनलाईन सुरक्षितता आणि डिजिटल तक्रारी सोडवण्याच्या हेतूने तयार करण्यात आलेले आहे, असेही शर्मा यांनी सांगितले. (फोटो – freepik)
तुमचा फोटो-व्हिडीओ परवानगीशिवाय इंटरनेटवर लीक झालाय? जाणून घ्या हटवण्याची पद्धत
जर तुमचा एखादा खाजगी फोटो किंवा व्हिडीओ तुमच्या परवानगीशिवाय इंटरनेटवर दिसत असेल तर ही अडचणीची बाब ठरू शकते
Web Title: How to remove private images video leaked on internet online harassment report cybercrime rak