• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. lava bold n1 5g specifications price and first sale information in marathi spl

भारतीय कंपनीने आणला सर्वात स्वस्त ५ जी स्मार्टफोन! किंमत फक्त ६,७४९ रुपये, स्पेसिफिकेशन्स काय? पहिला सेल उद्यापासून…

तुम्हालाही सर्वात  स्वस्त ५जी स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर लावा बोल्ड एन१ हा तुमच्यासाठी योग्य पर्याय असू शकतो. या फोनचा पहिला सेल उद्या म्हणजेच १३ सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. हा फोन अत्यंत स्वस्त मिळणार आहे, चला त्याची किंमत, ऑफर आणि फीचर्सवर एक नजर टाकूया…

September 13, 2025 11:40 IST
Follow Us
  • lava bold n1 5g first sale live
    1/7

    किंमत, रंग आणि पहिली विक्री
    भारतात लावा बोल्ड N1 5G ची विक्री उद्या (१३ सप्टेंबर) दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. त्याच्या ४GB + ६४GB व्हेरिएंटची किंमत ७,४९९ रुपये आहे आणि १२८GB व्हेरिएंटची किंमत ७,९९९ रुपये आहे. (Photo: LAVA)

  • 2/7

    ग्राहकांना SBI क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर ७५० रुपयांची त्वरित सूट मिळणार असल्याने ६४ जीबी मॉडेलची प्रभावी किंमत फक्त ६,७४९ रुपये होते आहे. हा फोन शॅम्पेन गोल्ड आणि रॉयल ब्लू या दोन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. (Photo: LAVA)

  • 3/7

    डिस्प्ले
    फोनमध्ये ६.७५ इंचाचा एचडी प्लस एलसीडी स्क्रीन आहे ज्याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्झ आहे आणि अॅस्पेक्ट रेशो २०:९ आहे. फोनमध्ये ड्युअल-सिम (नॅनो + नॅनो) सपोर्ट आहे. फोनच्या मागील बाजूस ग्लॉसी डिझाइन आहे. (Photo: LAVA)

  • 4/7

    प्रोसेसर
    हा फोन Unisoc T765 प्रोसेसरने सुसज्ज आहे आणि अँड्रॉइड १५ वर चालतो. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज आहे. तसे फोन ४ जीबी व्हर्च्युअल रॅमलाही सपोर्ट करतो. मायक्रोएसडी कार्ड स्टोरेज १ टीबी पर्यंत वाढवता येते. या फोनमध्ये एक अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम अपग्रेड आणि दोन वर्षांच्या सुरक्षा अपडेट्सचा समावेश आहे. फोनमध्ये कोणतेही अनावश्यक अॅप्स प्री-इंस्टॉल केलेले नाहीत. (Photo: LAVA)

  • 5/7

    कॅमेरा
    या फोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि एक सेकंडरी कॅमेरा आहे. हा फोन पोर्ट्रेट, नाईट, प्रो आणि स्लो मोशन सारख्या मोडसह येतो आणि ४K/३०fps व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सेलचा कॅमेरा उपलब्ध आहे. (Photo: LAVA)

  • 6/7

    बॅटरी
    फोनमध्ये ५०००mAh बॅटरी आहे जी १८W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. बॉक्समध्ये १०W चार्जरही येते. (Photo: LAVA)

  • 7/7

    इतर वैशिष्ट्ये
    हा फोन IP54 रेटिंगसह येतो. फोनमध्ये उपलब्ध कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ ४.२, OTG आणि USB टाइप-सी यांचा समावेश आहे. सुरक्षिततेसाठी, फोनमध्ये फेस अनलॉक आणि साइड फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आले आहे. (Photo: LAVA)

TOPICS
टेकTechटेक न्यूजTech NewsमोबाइलMobile

Web Title: Lava bold n1 5g specifications price and first sale information in marathi spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.