भगवान गोयल यांच्या ‘आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून गेले काही दिवस राज्यात गदारोळ सुरू होता. हा वाद सुरू असतानाच पवार यांना गेली अनेक वर्षे छत्रपती शिवाजी महाराज यांना वापरली जाणारी ‘जाणता राजा’ ही उपाधी लावण्यावरूनही वाद सुरू झाला आहे. जाणून घेऊयात जाणता राजावरून कोणी काय वक्तव्ये केली…. -
भाजपा नेते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराजांशी तुलना करण्यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. मात्र यावेळी त्यांनी शिवसेना, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर टीका करत तुफान फटकेबाजी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा फक्त राजकारणासाठी वापर केला जात असल्याचा आरोप शिवसेनेवर करत शरद पवार यांना जाणता राजा उपाधी देण्यावरुनही उदयनराजेंनी जोरदार टीका केली. एक युगपुरुष कधीतरी जन्माला येतो ते म्हणजे शिवाजी महाराज, जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. इतर कुणालाही जाणता राजा उपाधी देणं याचाही मी निषेध करतो, असे उदयनराजे म्हणाले. -
मला कार्यकर्ते ‘जाणता राजा’ म्हणतात. पण मी कोणालाही तसे म्हणायला सांगितले नव्हते, असे शरद पवार एका सभेत म्हणाले…
-
खरे तर ‘जाणता राजा’ ही उपाधी समर्थ रामदासांनी महाराजांना उद्देशून वापरली. परंतु त्यांची खरी उपाधी ही ‘छत्रपती’ हीच आहे. समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते. तर जिजाऊ माता या त्यांच्या गुरू होत्या, त्यामुळे महाराजांना ‘जाणता राजा’ म्हणण्याची गरज नाही. शिवाजी महाराज जन्माने, कर्तृत्वाने लोकांच्या अंत:करणात ‘छत्रपती’च राहतील, असे शरद पवार म्हणाले.
राज्याची संपूर्ण माहिती ज्यांना आहे त्यांनाच जाणता राजाच म्हटले जाते. शरद पवार यांच्या नावामुळे महाराष्ट्राचे नाव देशभरात आहे. त्यामुळे शरद पवार हे जाणता राजाच आहेत, असे संजय राऊत म्हणाले. जितेंद्र आव्हाड म्हणतात, “होय शरद पवार म्हणजे जाणता राजाच, हाताच्या तळव्यावरती महाराष्ट्राची ओळख असणारा एकमेव अद्वितीय नेता म्हणजेच शरद पवार. पाणीप्रश्न, शेतीचा प्रश्न, औद्योगिक वसाहतींचा प्रश्न, नागरी वस्तीचे प्रश्न, ग्रामीण अर्थव्यवस्थेचे प्रश्न, शेतकरी-शेतमजुरांचे प्रश्न अशी प्रश्नांची मालिका मांडा, महाराष्ट्रातील प्रत्येक प्रश्नांचं उत्तर शरद पवारांकडे आहे, म्हणून त्यांना आम्ही जाणता राजा म्हणतो." जाणता राजा हे कधीही पवारसाहेबांनी स्वत:ला लिहिलेलं नाही. जाणता राजा या शब्दाचा अर्थ म्हणजे कुठेतरी ज्याला सगळ्या विषयाची जाण असते. पण, पक्षाने कधीही त्या शब्दाचा वापर केला नाही, लोकं स्वत:हून त्यांना जाणता राजा म्हणतात, असे सांगत नवाब मलिक यांनी उदयनराजे भोसलेंवर नाव न घेता टीका केली. “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार हे एकमेव व्हिजन असणारी व्यक्ती आहेत. ते कोणाच्याही कानात जाऊन मला ‘जाणता राजा म्हणा’ असं सांगणार नाही,” अशा शब्दांत विक्रम गोखले यांनी शरद पवार यांची या वादामध्ये पाठराखणं केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केल्याने राजकीय पक्षांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना जाणता राजा म्हटलेलं कसं चालतं ? अशी विचारणा केली. मुंबईत शरद पवार समर्थकांकडून पोस्टरबाजी “आपापली राजकीय विचारसरणी निश्चित जोपासा, पण ज्या नेतृत्त्वामुळे महाराष्ट्र जगात ओळखला जातो त्या नेतृत्त्वावर अल्पमाहिती, अल्पज्ञानातून शिंतोडे उडवू नका. शरद पवार साहेब आम्हा तरुणांचे कालही जाणता राजा होते, आजही जाणता राजा आहेत आणि भविष्यातही जाणता राजाच राहणार”.
जाणता राजा : यांनी केली खळबळ उडवणारी वक्तव्ये
पवार यांना गेली अनेक वर्षे छत्रपती शिवाजी महाराज यांना वापरली जाणारी ‘जाणता राजा’ ही उपाधी लावण्यावरूनही वाद सुरू झाला आहे.
Web Title: Janata raja political statement leader shard pawar udayanraje bhosale nck