कर्णधार विराट कोहली सध्या भारतातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. एकेकाळी वडिलांच्या स्कूटरवरून क्रिकेट अकॅडमीत जाणाऱ्या विराटकडे अनेक अलिशान कार आहेत. विराट कोहलीला ऑडी कंपनीच्या गाड्यांची विशेष आवड आहे. -
लग्झरी कार बनवणारी जर्मनीची दिग्गज कंपनी Audi ने १६ जानेवारी २०२० रोजी भारतीय बाजारात आपली फ्लॅगशिप एसयूव्ही-कूप Q8 लाँच केली. ही गाडी खरेदी करणारा पहिला ग्राहक भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ठरलाय. तब्बल १. ३३ कोटी रुपये इतकी या कारची एक्स-शोरुम किंमत ठेवण्यात आली आहे.
दोन कोटी रूपयांची ऑडी कंपनीची R8 V10 ही कार विराटच्या ताफ्यात आहे. या गाडीत 5.2-litre V10 इंजिन आहे. -
ऑडी A8L W12क्वाट्रो – किंमत एक कोटी ८७ लाख रूपये. ही कार A8 चे लॉन्ग व्हील बेस व्हर्जन आहे. ऑडी Q7 4.2 TDI: किंमत ८८ लाख -
९५ लाख २५ हजारांची ऑडी S6 ही गाडी विराटच्या ताफ्यात आहे.
जापानी ऑटोमेकर्सनी विराटला टोयाटो फॉर्च्युनर गाडी गिफ्ट म्हणून दिली होती. -
२०१२ च्या श्रीलंका दौऱ्यात विराट कोहलीला मालिकावीर पुरस्कार प्रदान करण्या आला. मालिकावीर पुरस्कारात विराटला Renault Duster ही गाडी देण्यात आली होती.
‘या’ गाडीचा विराट आहे दिवाना, किंमत कोटींच्या घरात
वडिलांच्या स्कूटरवरून फिरणाऱ्या विराटच्या ताफ्यात आहेत अलिशान कार
Web Title: Virat kohlis car collection take a look at his audi r8 a8 q7 and others nck