• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. winter health benefits of honey nck

हिवाळ्यात मध खाण्याचे हे आहे १४ फायदे

थंडीच्या दिवसांत मध खाण्याचे अनेक फायदे आहेत…

January 26, 2020 15:27 IST
Follow Us
    • सर्वात उत्तम नैसर्गिक औषध म्हणजे मध! मधाचे महत्व अगदी आयुर्वेदातही नमूद करण्यात आले आहे. कोणताही ऋतू असला तरी रोज केवळ दोन चमचे मधाचे सेवन केल्याने शरीर निरोगी आणि स्वस्थ राहते. मात्र थंडीमध्ये मध खाण्याचे विशेष फायदे आहेत.
    • मध खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. हिवाळ्यामध्ये सर्दी खोकल्याचा त्रास जवळजवळ सर्वांनाच होतो. मात्र रोग प्रतिकारक शक्ती जास्त असल्यास असे व्हायरल आजार पटकण होत नाहीत
    • हिवाळ्यामध्ये पटकण भूक लागत नाही त्यामुळे भरपूर भूक लागण्यासाठी मध उपयोगी ठरतो.
    • खाज, खरूज यासारख्या त्वचेसंबंधीत आजारांचा ज्यांना त्रास होतो त्यांनी ग्लासभर पाण्यात एक चमचा मध घालून सकाळी रिकाम्या पोटी प्यावे. त्यामुळे या त्वचा रोगांचा त्रास कमी होतो.
    • ज्यांना डोळ्यांशी संबंधीत आजार असेल त्यांनी गाजर आणि मधाचे एकत्रित सेवन करणे फायद्याचे ठरते. दोन लहान चमचे मध गाजराच्या रसामध्ये घालून प्यावे. मधाबरोबर घेतलेला हा गजराचा सर निरोगी दृष्टीसाठी फायद्याचा असतो. डोळ्यांत सतत पाणी येण्याचा त्रास असणाऱ्यांनाही मध घालून गाजराचा रस पिणे फायद्याचे ठरते.
    • 1/15

      आयुर्वेदानुसार उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी मधाचे सेवन केल्यास रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. एक चमचा लसणाचा रस आणि दोन लहान चमचा मधाच्या मिश्रणाचे नियमितपणे सेवन केल्यास राक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत होते.

    • रक्तशुद्धीसाठी मध उपयुक्त असतो. त्यामुळेच अनेकदा नियमीत मधाचे सेवन करावे असा सल्ला दिला जातो.
    • पोट दुखत असेल, मळमळत असेल तर आल्याच्या किंवा लिंबाच्या रसात मध मिसळून खाल्ल्यास पोटाला आराम मिळतो.
    • मध आणि दूध एकत्र प्यायल्याने रोगप्रतिकार क्षमता वाढते. तसेच त्वचा चमकदार होते. दूध आणि मध एकत्र मिसळून त्वचेवर लावल्यास त्वचा चमकदार होते.
    • मधाच्या सेवनाने शरिराला आर्यन, कॅल्शियम, सोडियम, फॉस्फोरस आणि आयोडीन यासारख्या महत्वाच्या घटकांचाही योग्य प्रमाणात पुरवठा होतो. ज्यामुळे शरीर ताकदवान होते.
    • थंडीतला ठरलेला आजर म्हणजे सर्दी, पडसे किंवा छातीत कफ होणे. या तिन्ही तक्रारींवर एकमेक उपाय म्हणजे चहामध्ये किंवा कोमट पाण्यात एक ते दोन चमचे मध टाकून प्यावे. याचा बराच फरक पडतो.
    • मधाच्या सेवनाने शरिरास मुबलक प्रमाणात अ, ब आणि क जीवनसत्व मिळतात.
    • थंड पाण्यामध्ये मध मिसळून दररोज प्यायल्यास त्वचा तजेलदार राहते.
    • केसांच्या आरोग्यासाठीही मध फायद्याचे ठरते. दररोज दोन चमचे मध खालल्यास केसांची चांगली वाढ होते.
    • मध, आले आणि काळी मिरी पावडरच्या सम प्रमाणातील मिश्रण करुन ते नियमित प्यायल्यास दम्याच्या आजार निश्चितपणे कमी होतो.

Web Title: Winter health benefits of honey nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.