दादर येथे पक्षाचे स्थानिक पदाधिकारी अभिषेक गुप्ता यांनी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं आहे. यावेळी त्यांनी बॅटिंग करत तुफान फटकेबाजी केली. शनिवारी अमित ठाकरे यांच्या हस्ते क्रिकेट सामने आणि कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. मनसेने पक्षाचा झेंडा बदलला असून नव्या झेंड्यात भगवा रंग वापरण्यात आला आहे. नेतेपदी निवड करण्यात आल्यानंतर अमित ठाकरे यांनी कार्यक्रमांना हजेरी लावत लोकांशी संवाद वाढवण्याचं काम सुरु केलं आहे. भविष्यातील नेतृत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेते अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी नुकतीच राजकारणात एंट्री केली आहे. मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरे यांनी मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली. मनसेच्या भविष्यातील वाटचालीत अमित ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे, यावेळी आदित्य ठाकरे यांनी भगव्या रंगाचं टी-शर्ट घातलं होतं.
भगवा टी-शर्ट घालून अमित ठाकरेंची मैदानात तुफान फटकेबाजी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेते अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी नुकतीच राजकारणात एंट्री केली आहे.
Web Title: Mns amit thackeray plays cricket during inauguration sgy