-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिल्लीमधील हुनर हाट या प्रदर्शनाला भेट दिली.
-
हुनर हाट या प्रदर्शनातील अनेक लघु उद्योजकांच्या स्टॉलला पंतप्रधान मोदींनी भेट दिली.
-
मोदींनी या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या विक्रेत्यांच्या स्टॉलची भेट दिली.
-
पंतप्रधान आपल्या स्टॉलवर आल्याचे पाहून अनेक विक्रेत्यांचा आनंद पोटात मावेनासा झाला होता.
-
मोदींबरोबर मुक्तार अब्बास नकवी ही होते.
-
मोदींनी या प्रदर्शनामध्ये विक्रिसाठी असणाऱ्या अनेक वस्तू स्टॉलवर जाऊन पाहिल्या.
-
जवळजवळ अर्धा तास मोदी हुनर हाट प्रदर्शनाच्या ठिकाणी होते.
-
मोदींनी खाण्याच्या स्टॉल्सला भेट देऊन तेथील विक्रेत्यांकडून वेगवगेळ्या पदार्थांची आणि ते कसे बनवतात यासंदर्भातील माहिती जाणून घेतली.
-
मोदींनी या ठिकाणी पारंपारिक पदार्थांचा आस्वादही घेतला.
-
मोदींनी या ठिकाणी लिट्टी चोखा या बिहारमधील पदार्थाचा आस्वादही घेतला.
-
लिट्टी चोखा आणि इतर खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतानाचा मोदींचा हा फोटो सोशल नेटवर्किंगवर चांगलाच व्हायरल झाला आहे.
-
मोदींनी चहाचाही आस्वाद घेतला.
-
काही कलाकारांनी मोदींना त्यांचे फोटो असणाऱ्या खास कलाकृतीही दाखवल्या.
-
मोदींबरोबर सेल्फी काढण्यासाठी महिला लघुउद्योजकांमध्ये चढाओढ दिसून आली.
-
मोदी या ठिकाणी येणार असल्याने चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
-
मोदींच्या ट्विट हॅण्डलवरुन या प्रदर्शनातील मोदींचे काही फोटो ट्विट करण्यात आले आहेत.
-
पंतप्रधानांबरोबर अनेक विक्रेत्यांनी मनमोकळेपणे गप्पा मारल्या.
-
मोदींची झलक कॅमेरात टिपण्यासाठी चढाओढ सुरु होती.
-
मोदींनी या प्रदर्शनासंदर्भातील माहिती आयोजकांकडून घेतली.
-
मोदींचे अनेक फोटो भाजपाच्या नेत्यांनाही ट्विटवरुन शेअर केले आहेत.
मोदींची इंडिया गेट भेट! लिट्टी चोखा अन् चाय पे चर्चा
दिल्लीमधील हुनर हाट प्रदर्शनातील मोदींचे फोटो व्हायरल
Web Title: Pm modi visited hunar haat at india gate new delhi scsg