-
आज देशभरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. अनेकजण आज मंदिरात जाऊन भगवान शंकराचे दर्शन घेत आहेत. आज सर्वच शंकर मंदिरे गर्दीने फुलून गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
-
एकंदरितच संपूर्ण भारतामध्ये अनेक ठिकाणी शिवमंदिरे पहायला मिळतात. केवळ श्रद्धा आणि भक्तिभाव नव्हे, तर शिल्पसंस्कृतीचा उत्तम नमुना म्हणून शिवालयांकडे पाहिले जाते. आज महाशिवरात्रीनिमित्त तुम्हाला आम्ही भारतामधील सात प्राचीन शिवमंदिराबद्दलची माहिती देणार आहोत.
-
विश्वेश्वर (उत्तर प्रदेश – वाराणसी)– वाराणसी भारताची सांस्कृतिक राजधानी असून ते गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. शहराच्या मध्यावर विश्वनाथ मंदिर असून तेथे भगवान शिव, विश्वेतश्वगर किंवा विश्वनाथ ज्योतिर्लिंग आहे.
-
रामेश्वरम (तमिळनाडू) – तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम बेटावर असलेले एक शिवमंदिर आहे. हे तीर्थक्षेत्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी व चार धामांपैकी एक मानले जाते. विशाल नंदी व १००० फुट लांब , ६५० फुट रुंद आणि १२५ फुट उंच असे रामेश्वर चे मंदिर आहे. वार्षिक उत्सवाच्या वेळेस भगवान शंकर व पार्वतीची सोन्या चांदीच्या रथातून भव्य मिरवणूक काढली जाते.
-
मल्लिकार्जुन (आंध्र प्रदेश)– रागावून गेलेल्या कुमार कार्तिकेयाला भेटण्याकरीता (मल्लिका) पार्वती व अर्जुन (शंकर) येथे आले म्हणून मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले. हे मंदिर आंध्र प्रदेशमध्ये आहे. मल्लिकार्जुनाच्या पलीकडे पाच मैलांवर पाताळगंगा (कृष्णा) आहे.
-
लिंगराज मंदिर (ओडीसा) – ओडीसामध्ये असलेले लिंगराज मंदिर प्राचीन शिवमंदिरापैकी एक आहे. या मंदिराच्या दर्शनासाठी प्रत्येक सोमवारी भाविकांची गर्दी असते.
-
केदारनाथ (उत्तरांचल – केदारनाथ) – हे हिमालयात उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये मंदाकिनी नदीच्या किनारी आहे. केदारनाथ हे ज्योतिर्लिंगांबरोबरच चार धामांपैकी एक धामही आहे. प्रतिकूल हवामानामुळे हे मंदिर एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीतच दर्शनासाठी खुले असते.
-
मुरुडेश्वर शिव मंदिर – कर्नाटकातील मुरुडेश्वर शिव मंदिर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. त्यामुळे शांत आणि सुंदर वातारणामध्ये असलेल्या मंदिराच्या दर्शनासाठी शिवभक्तासह पर्यटकही येतात.
-
अमरनाथ मंदिर – अमरनाथ गुफांचे दर्शन करण्यासाठी पर्यटक विदेशातूनही येतात. येथे बर्फाचे शिवलिंग तयार होते.
-
यापैकी तुम्ही किती मंदिरे पाहिली आहेत? कमेंट करुन नक्की कळवा.
महाशिवरात्री विशेष: भारतातील या सात प्राचीन शिवमंदिरांना एकदा आवर्जून भेट द्या
यापैकी तुम्ही किती मंदिरे पाहिली आहेत?
Web Title: Mahashivratri 2020 most famous shiva temples across india scsg