Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. india top 10 two wheelers sold in january 2020 know all details sas

टू-व्हीलरमध्ये ‘ही’ ठरली नवीन BOSS, ‘स्प्लेंडर’वर केली मात

भारताच्या टू-व्हीलर सेगमेंटमध्ये नवीन ‘बॉस’…

February 21, 2020 12:20 IST
Follow Us
    • सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM)ने भारतात जानेवारी 2020 मध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या दुचाकींची यादी (टॉप 10 बेस्ट सेलर टू-व्हीलर) जाहीर केली आहे. या क्रमवारीनुसार हीरोची लोकप्रिय बाइक स्प्लेंडरवर मात करत एक नवी गाडी अव्वल ठरली आहे. एक नजर मारुया टॉप 10 सर्वाधिक विक्री झालेल्या दुचाकींवर..
    • SIAM ने जारी केलेल्या यादीमध्ये सर्वात शेवटी म्हणजे 10 व्या क्रमांकावर हीरोची Glamour ही बाइक आहे. जानेवारी 2020 मध्ये 40 हजार 318 ग्लॅमरची विक्री झाली.
    • नवव्या क्रमांकावर रॉयल एनफिल्डची लोकप्रिय बुलेट Classic 350 आहे. जानेवारी 2020 मध्ये 40 हजार 834 Classic 350 विकल्या गेल्या.
    • 1/11

      सर्वाधिक विक्री झालेल्या दुचाकींमध्ये आठव्या क्रमांकावर बजाज CT ही बाइक आहे. जानेवारी 2020 मध्ये 42 हजार 497 बजाज CT बाइकची विक्री झाली.

    • 2/11

      सातव्या क्रमांकावर TVS XL Super आहे. 52 हजार 525 इतक्या TVS XL Super जानेवारी 2020 मध्ये विकल्या गेल्या.

    • 3/11

      SIAM ने जारी केलेल्या यादीनुसार सहाव्या क्रमांकावर Suzuki Access ही स्कुटी असून जानेवारी महिन्यात या स्कुटीच्या 54 हजार 595 युनिट्सची विक्री झाली.

    • 4/11

      सर्वाधिक विक्री झालेल्या दुचाकींमध्ये पाचव्या क्रमांकावर होंडाची CB Shine आहे. जानेवारीमध्ये या बाइकच्या 66 हजार 832 युनिट्सची विक्री झाली.

    • 5/11

      चौथ्या क्रमांकावर बजाजची लोकप्रिय बाइक पल्सर आहे. जानेवारीमध्ये 68 हजार 354 पल्सर विकल्या गेल्या.

    • 6/11

      या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा हीरोची HF Deluxe ही बाइक आहे. जानेवारी 2020 मध्ये HF Deluxe च्या 1 लाख 91 हजार 875 HF Deluxe बाइक विकल्या गेल्या.

    • 7/11

      त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर हीरोची सर्वाधिक लोकप्रिय Splendor ही बाइक आहे. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात स्प्लेंडर या यादीमध्ये अव्वल क्रमांकावर होती. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात 2 लाख 23 हजार 909 स्प्लेंडरची विक्री झाली होती. तर यावेळेस जानेवारीमध्ये 2 लाख 22 हजार 578 स्प्लेंडरची विक्री झाली.

    • 8/11

      सर्वाधिक विक्री झालेल्या दुचाकींमध्ये होंडाची Activa सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. जानेवारी 2020 मध्ये या लोकप्रिय स्कुटीच्या 2 लाख 34 हजार 749 इतक्या युनिट्सची विक्री झाली. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये 2 लाख 13 हजार 302 Activa विकल्या गेल्या होत्या आणि ही स्कुटी दुसऱ्या क्रमांकावर होती. पण आता स्प्लेंडरला मागे टाकत Activa अव्वल ठरली आहे.

TOPICS
दुचाकीTwo Wheeler

Web Title: India top 10 two wheelers sold in january 2020 know all details sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.