-
सीएए आणि एनआरसीविरोधात बंगळुरूमध्ये गुरूवारी रात्री रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत 'एआयएमआयएम'चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हेही सहभागी झाले होते. ओवेसी व्यासपीठावर असतानाच एका तरुणीनं तिथं येऊन पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. तिचं नाव अमूल्या लियोना नोरोन्हा. (फोटो : इंडियन एक्स्प्रेस/अमूल्या लियोना नोरोन्हा फेसबुक पेज)
-
अमूल्या सध्या पत्रकारितेचं शिक्षण घेत आहे. रॅलीत सहभागी झाल्यानंतर तिनं घोषणा दिल्या. ज्याचा असदुद्दीन ओवेसी यांनीही निषेध केला. याप्रकरणी तिच्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. तसेच न्यायालयानं तिचा जामीन फेटाळून लावत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
-
अमूल्या सोशल मीडियावर सक्रिय असते. फेसबुकवर तिच्या नावानं पेज आहे. ट्विटरवरही ती सक्रिय असते. त्याचबरोबर अमूल्या ब्लॉगही चालवते. तिच्या नावानं चालवण्यात येणाऱ्या अकाऊंटची पडताळणी करण्यात आलेली नाही.
-
सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी सुरू झाल्यानंतर १९ वर्षीय अमूल्या आक्रमक झाली. यापूर्वी झालेल्या सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात निघालेल्या रॅलीमध्ये ती सहभागी झालेली आहे.
-
मनिपालच्या क्राइस्ट स्कूल आणि संत नॉबर्ट सीबीएसई शाळेतून तिनं शालेय शिक्षण घेतलं आहे. बंगळुरूमधील एनएमकेआरव्ही महाविद्यालयात अमूल्या शिक्षण घेत आहे. त्याचबरोबर ती बंगळुरूमधील रेकॉर्डिंग कंपनीत भाषांतरकार म्हणून काम करायची.
-
गुरूवारी अमूल्यानं घोषणा दिल्या. त्यानंतर तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या सगळ्या प्रकरणावर अमूल्याच्या वडिलांनी स्वतःला दूर केलं आहे.
-
'अमूल्या काही मुस्लीम मुलांच्या संपर्कात होती. तिला आधीच सावध करण्याचा प्रयत्न केला होता. पण, तिनं माझं म्हणणं ऐकलं नाही. माझी तब्येत चांगली नसल्यानं तिला फोन करून बोलवलं होतं. पण, तिनं येण्यास नकार दिला व काळजी घेण्याचा सल्ला दिला," असं तिच्या वडिलांनी म्हटलं आहे.
-
'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्यानंतर अमूल्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. तिच्याविषयी बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांनी गौप्यस्फोट केला आहे.
-
देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेल्या अमूल्याचं नक्षलवाद्यांशीही संबंध होते, असं येदियुरप्पा म्हणाले आहेत.
-
अमूल्यानं व्यासपीठावरून दिलेल्या घोषणांचा एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी निषेध केला आहे. अमूल्याचा आपल्या पक्षाशी संबंध नाही. आमच्यासाठी हिंदुस्थान जिंदाबाद होता. जिंदाबाद राहिलं, असं ओवेसी म्हणाले आहेत.
‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणणारी अमूल्या कोण?
सीएए आणि एनआरसीविरोधी रॅलीत अमूल्यानं घोषणा दिल्या.
Web Title: Who is amulya leona noronha bmh