• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. know about american president donald trump wife america first lady melania trump dmp

PHOTOS: न्यूड फोटो शूट ते अमेरिकेची फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांच्याबद्दल काही खास गोष्टी

February 23, 2020 16:33 IST
Follow Us
  • डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, पण सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं ते त्यांच्या पत्नीने, म्हणजेच मेलानिआ ट्रम्प यांनी. (सर्व फोटो सौजन्य - मेलानिया ट्रम्प इन्स्टाग्राम)
    1/15

    डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, पण सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं ते त्यांच्या पत्नीने, म्हणजेच मेलानिआ ट्रम्प यांनी. (सर्व फोटो सौजन्य – मेलानिया ट्रम्प इन्स्टाग्राम)

  • 2/15

    मेलानिया या अमेरिकी नव्हेत. त्यांचे बालपण कम्युनिस्ट अमलाखालील युगोस्लाव्हियात गेले आणि युगोस्लाव्हियात यादवी उफाळल्यानंतर आज त्यांचा मूळ देश स्लोव्हेनिया म्हणून ओळखला जातो.

  • 3/15

    मेलानियांना एकटे राहणेच अधिक पसंत आहे, त्यांना समाजकार्याची आवड आहेच पण त्या अतिशय संवेदनशील आहेत असे फ्रि मेलानिया या पुस्तकात म्हटले आहे.

  • 4/15

    २०१६ साली अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्याआधी मेलानिया ट्रम्प यांच्या न्यूड फोटोचा राजकारणासाठी वापर झाला होता.

  • 5/15

    अमेरिकेतील एका वर्तमानपत्रान मेलानिया यांचा न्यूड फोटो प्रसिद्ध केला होता. मेलानिया यांच्या मॉडलिंगच्या दिवसांमधला हा फोटो होता.

  • 6/15

    १९९५ साली मॅनहॅटनमध्ये एका शूटच्यावेळी हे फोटो काढण्यात आले होते. फ्रान्समधील एका पुरुषांच्या मॅगझीनसाठी हे फोटो काढण्यात आले होते. फ्रान्समधील एका फोटोग्राफरने हे फोटो काढले होते.

  • 7/15

    स्लोव्हेनियामध्ये जन्मलेल्या मेलानिया ट्रम्प त्या फोटो शूटच्यावेळी २५ वर्षांच्या होत्या व मोनिकेर मेलानिया म्हणून ओळखल्या जायच्या.

  • 8/15

    डोनाल्ड ट्रम्प यांना जेव्हा मेलानिया यांच्या फोटोशूटबद्दल विचारण्यात आले तेव्हा, मेलानिया एक यशस्वी मॉडेल होत्या. त्यांनी अनेक मॅगझीनसाठी फोटोशूट केले आहे असे उत्तर दिले.

  • 9/15

    अब्जोपती असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर मेलानियाची १९९८ साली न्यूयॉर्क फॅशन वीकच्यावेळी ओळख झाली.

  • 10/15

    डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर मेलानियाने २००५ साली विवाह केला. २००६ मध्ये त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले.

  • 11/15

    मेलानिया ट्रम्प यांचा हा पहिला विवाह आहे तर, डोनाल्ड ट्रम्प यांचा तिसरा. दुसऱ्या पत्नीला घटस्फोट देऊन त्यांनी मेलानिया बरोबर विवाह केला.

  • 12/15

    डोनाल्ड ट्रम्प यांना पहिल्या दोन पत्नींपासून मुले आहेत. मेलानियापासूनही त्यांना एक मुलगा आहे.

  • 13/15

    डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकन जनतेवर प्रेम आहे. ते अमेरिकेसाठी चांगले काही तरी करु शकतात. त्यामुळे मी त्यांना प्रोत्साहन देते, असे २०१५ साली मेलानिया ट्रम्प म्हणाल्या होत्या.

  • 14/15

    अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या कुठल्याही परदेश दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्याइतकी फर्स्ट लेडीची सुद्धा चर्चा असते.

  • 15/15

    मिशेल ओबामा यांच्यानंतर मेलानिया ट्रम्प फर्स्ट लेडीचा वारसा यशस्वीरित्या सांभाळू शकतात का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. पण आतापर्यंत तरी मेलानिया यांनी त्यांच्यामुळे कुठलाही वाद होणार नाही याची काळजी घेतली आहे.

Web Title: Know about american president donald trump wife america first lady melania trump dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.