• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. pm narendra modi broke security protocols when meet donald trump dmp

PHOTOS: बघा पंतप्रधान मोदींनी किती वेळ मोडला प्रोटोकॉल

February 24, 2020 12:57 IST
Follow Us
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी खास अहमदाबाद विमानतळावर उपस्थित होते. मोदींनी गळाभेट घेऊन ट्रम्प यांचे स्वागत केले असले तरी, त्यांनी शिष्टाचाराचे उल्लंघन केले.
    1/10

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी खास अहमदाबाद विमानतळावर उपस्थित होते. मोदींनी गळाभेट घेऊन ट्रम्प यांचे स्वागत केले असले तरी, त्यांनी शिष्टाचाराचे उल्लंघन केले.

  • 2/10

    मोदींनी शिष्टाचाराचे उल्लंघन करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी सुद्धा अन्य देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या स्वागतासाठी मोदींनी शिष्टाचाराचे उल्लंघन केले आहे.

  • 3/10

    दोन वर्षांपूर्वी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारतात आले होते. त्यावेळी सुद्धा मोदींनी विमानतळावर जाऊन त्यांचे स्वागत केले होते.

  • 4/10

    १४ जानेवारी २०१८ रोजी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू भारतात आले होते. त्यावेळी सुद्धा मोदींनी विमानतळावर जाऊन प्रोटोकॉल मोडून त्यांचे स्वागत केले होते.

  • 5/10

    २५ जानेवारी २०१५ रोजी मोदींनी विमानतळावर जाऊन अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे स्वागत केले होते. त्यावेळी सुद्धा प्रोटोकॉल मोडला होता.

  • 6/10

    २०१५ साली पंतप्रधान मोदींनी अचानक पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या निवासस्थानी काही तासांची भेट देऊन सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन केले होते. त्यावेळी शरीफ यांचा बर्थ डे तर नातीचे लग्न होते.

  • 7/10

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अबू धाबीचे प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या स्वागताला उपस्थित राहून प्रोटोकॉल मोडला होता.

  • 8/10

    २५ जून २०१८ रोजी मोदी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भेटण्यासाठी अचानक नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात जाऊन पोहोचले होते. त्यावेळी सुद्धा त्यांनी सुरक्षा प्रोटोकॉल मोडला होता.

  • 9/10

    १५ ऑगस्ट २०१८ रोजी लाल किल्ल्यावर लहान मुलांना भेटण्यासाठी मोदींनी प्रोटोकॉल मोडला होता.

  • 10/10

    ६९ व्या प्रजासत्ताकदिनी सुद्धा राजपथावर नागरिकांना भेटण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सुरक्षा प्रोटोकॉल मोडला होता.

Web Title: Pm narendra modi broke security protocols when meet donald trump dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.