• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. bs4 vehicles stock clearing sale hyundai discount upto rs 2 5 lakh sas

स्टॉक संपवण्याचा सेल, आता Hyundai च्या गाड्यांवर बंपर डिस्काउंट

Hyundai कडे मोठ्या प्रमाणात बीएस-4 गाड्यांचा स्टॉक पडून….

February 25, 2020 16:11 IST
Follow Us
    • जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Hyundai India कडून दिली जाणारी Discount Offer एखाद्या लॉटरीपेक्षा कमी नाहीये. भारतात इंजिनसाठी नवे 'बीएस 6' निकष एक एप्रिल 2020 पासून लागू होणार आहेत. पण, अद्यापही Hyundai कडे BS4 गाड्यांचा स्टॉक मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.
    • 1/15

      लवकरच इंजिनसाठी बीएस 6 निकष लागू होत असल्यामुळे आपल्याकडील उर्वरित बीएस-4 वाहनांचा स्टॉक संपवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. यासाठी कंपनीकडून Grand i10, Grand i10 NIOS, Elite i20, Santro, Creta, Xcent, Verna, Tuscon आणि Elantra यांसारख्या गाड्यांवर तब्बल 2.5 लाख रुपयांची घसघशीत सवलत दिली जात आहे. जाणून घेऊया कोणत्या गाडीवर किती डिस्काउंट –

    • 2/15

      Hyundai Verna – या लोकप्रिय कारवर कंपनीकडून तब्बल 80 हजार रुपये डिस्काउंटची ऑफर आहे. यात 50 हजार रुपये कॅश डिस्काउंट मिळेल. तर, 30 हजार रुपये एक्सचेंज डिस्काउंट मिळेल. म्हणजेच एकूण 80 हजार रुपयांची बचत होऊ शकते.

    • 3/15

      Hyundai Elantra या शानदार गाडीच्या पेट्रोल आणि डिझेल दोन्ही व्हेरिअंटवर सवलत आहे. कंपनीकडून या गाडीच्या खरेदीवर 2.5 लाख रुपयांपर्यंत घसघशीत डिस्काउंटची ऑफर देण्यात आली आहे.

    • 4/15

      Hyundai Santro : ही कार कंपनीची बेस्ट सेलिंग हॅचबॅक कार आहे. या कारच्या खरेदीवर कंपनीकडून एकूण 50 हजार रुपयांची सवलत दिली जात आहे. यातील 30 हजार रुपये कॅश डिस्काउंट आणि 20 हजार रुपये एक्सचेंज डिस्काउंट असेल.

    • 5/15

      Hyundai Xcent च्या पेट्रोल आणि डिझेल दोन्ही मॉडेलवर कंपनीकडून 90 हजार रुपये कॅश डिस्काउंटची ऑफर दिली जात आहे.

    • 6/15

      Hyundai Grand i10 या कारवर कंपनीकडून एकूण 70 हजार रुपयांची सवलत आहे. त्यात 40 हजार रुपये कॅश डिस्काउंट आणि 30 हजार रुपये एक्सचेंज डिस्काउंट मिळेल.

    • 7/15

    • 8/15

      Hyundai Elite i20 च्या Era आणि Magma+ या दोन व्हेरिअंटवर 20 हजार रुपये कॅश डिस्काउंट मिळेल. याशिवाय 20 हजार रुपये एक्सचेंज डिस्काउंटही मिळेल. एकूण 40 हजार रुपयांची सवलत दिली जात आहे.

    • 9/15

      याशिवाय Hyundai Elite i20 Sportz+ किंवा त्यावरील व्हेरिअंटवर एकूण 60 हजार रुपये डिस्काउंट आहे. यातील 40 हजार रुपये कॅश डिस्काउंट आहे, तर 20 हजार रुपये एक्सचेंज डिस्काउंट मिळेल.

    • 10/15

      Hyundai Creta : कंपनीच्या या लोकप्रिय गाडीवर एकूण एक लाख पाच हजार रुपये डिस्काउंट दिले जात आहे. ही ऑफर पेट्रोल आणि डिझेल दोन्ही व्हेरिअंटवर असून यात 75 हजार रुपये कॅश डिस्काउंट मिळेल, तर 30 हजार रुपये एक्सचेंज डिस्काउंट आहे.

    • 11/15

      Hyundai Venue – या कारच्या बीएस-4 इंजिनचा स्टॉक जवळपास संपलाय, त्यामुळे कंपनीकडून या गाडीवर डिस्काउंटची ऑफर नाहीये.

    • 12/15

      Hyundai Tucson या शानदार गाडीच्याही पेट्रोल व डिझेल दोन्ही व्हेरिअंट्सवर कंपनीकडून 2.5 लाख रुपयांपर्यंत भरघोस डिस्काउंट दिले जात आहे.

    • 13/15

      कंपनीकडून देण्यात आलेली ही डिस्काउंटची ऑफर केवळ फेब्रुवारी महिन्यासाठी आहे.

    • 14/15

      देशभरातील कंपनीच्या सर्व डिलरशीपमध्ये घसघशीत सवलतीचा लाभ घेता येईल.

TOPICS
ऑटोमोबाइलAutomobileह्युंदाईHyundai

Web Title: Bs4 vehicles stock clearing sale hyundai discount upto rs 2 5 lakh sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.