-
जर तुम्ही मुंबई, चेन्नई, बेंगळुरु आणि दिल्ली अशा शहरांमध्ये स्वस्तात घर, दुकान किंवा प्लॉट खरेदी करण्याचा विचार असेल तर देशातील सर्वात मोठी बँक अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया तुमचं हे स्वप्न पूर्ण करु शकते. एसबीआयकडून व्यावसायिक आणि निवासी मालमत्तेचा (Residential and Commercial Property)मोठा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. तुम्हालाही या लिलाव प्रक्रियेत सहभागी होता येईल. जाणून घेऊया ही लिलाव प्रक्रिया…
-
एसबीआय बँकेकडून आज(दि.२६) डिफॉल्टर्सच्या म्हणजेच कर्ज न फेडणाऱ्यांच्या निवासी आणि व्यावसायिक मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. "२६ फेब्रुवारी रोजी एसबीआयच्या मेगा ई-ऑक्शनमध्ये सहभागी होण्यासाठी तयार राहा", अशाप्रकारची माहिती एसबीआयने ट्विटरद्वारे दिली आहे.
डिफॉल्टर्स म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर ज्यांनी वेळेवर बँकेचं कर्ज फेडलं नाही अशा व्यक्तींच्या संपत्तीचा कर्ज वसुलीसाठी लिलाव केला जातो. हा लिलाव 26 फेब्रुवारी, 2020 रोजी होत आहे. या मालमत्तेची किंमत रिअल इस्टेट बाजारभावातील किंमतीच्या तुलनेत बरीच कमी असण्याची शक्यता आहे. -
या लिलावात सहभागी होण्यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करु शकतात. ऑनलाइन संकेतस्थळावर बँकेकडून काही आवश्यक कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. कोणती आहेत ही कागदपत्र…
आवश्यक कागदपत्रांमध्ये डिजिटल स्वाक्षरीसोबत केवायसी कागदपत्रांचा समावेश आहे. तसेच, EMD म्हणजे अर्नेस्ट मनी डिपॉजिट करावे लागतील. जवळच्या शाखेमध्ये जाऊन किंवा ऑनलाइन तुम्हाला ही कागदपत्रे भरावी लागतील त्यानंतर तुम्ही या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात. ऑनलाइन या लिलावाविषयी सविस्तार माहिती… लिलावाविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी https://bank.sbi/web/sbi-in-the-news/auction-notices/mega-e-auction या लिंकवर क्लिक करु शकतात. याशिवाय अधिक माहितीसाठी SBI ने अजून तीन लिंक शेअर केल्या आहेत. -
https://www.bankeauctions.com/Sbi – या लिंकवर लिलावाबात अधिक माहिती उपलब्ध आहे. याशिवाय, एसबीआयने https://sbi.auctiontiger.net/EPROC/ – https://ibapi.in – लिलावाच्या माहितीसाठी ही दुसरी लिंक उपलब्ध केली आहे. तसेच, लिलावात सहभागी होणाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बँकेने https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp ही तिसरी लिंकही शेअर केली आहे.
-
कोणत्या परिसरातल्या मालमत्तेचा लिलाव होणार आहे, ती प्रॉपर्टी कशी आहे, याबाबतचा सर्व तपशीलही बँकेकडून संभाव्य खरेदीदाराला दिला जाईल.
अशा मालमत्तांच्या लिलावाच्या आधी बँकेकडून त्याबाबत वर्तमानपत्र किंवा आणखी काही पद्धतीने जाहिरात दिली जाते. जास्तीत जास्त लोकांनी या लिलावात भाग घ्यावा हा याचा उद्देश असतो. -
एसबीआयने कोर्टाच्या आदेशानंतरच या संपत्तीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतलाय. कोर्टाच्या आदेशानंतर लिलाव होत असल्यामुळे प्रॉपर्टीची वैधता किंवा मालकी हक्काबाबत तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाहीये.
अर्ध्या किंमतीत ‘प्रॉपर्टी’ खरेदी करा, SBI कडून आज ‘मेगा ई-लिलाव’
SBI च्या ऑनलाइन Mega E-Auction मध्ये तुम्हालाही होता होईल सहभागी…
Web Title: Sbi state bank of india auction mega e auction defaulters property offers listed properties at affordable price know how to apply and all other details sas