-
सीएए, एनआरसी आणि एनपीआर विरोधात दिल्लीतील शाहीन बागेत महिलांनी आंदोलन सुरू केलं. हे आंदोलन सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यस्थीनंतर थांबलं. त्यानंतर ईशान्य दिल्लीतील जाफराबाद मेट्रो स्टेशन २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी महिलांनी आंदोलन सुरू केलं. (Photo : Indian Express-Amit Mehra/Gajendra Yadav/Abhinav Saha/Praveen Khanna/Sourav Roy Barman).
-
शनिवारी (२२ फेब्रुवारी) सुरू झालेल्या सीएए विरोधी आंदोलनाला विरोध करत भाजपाचे नेते कपिल मिश्रा यांनी रविवारी या आंदोलनाला विरोध करण्यासाठी मौजपूर परिसरात रॅली काढली. त्यावेळी ही दगडफेक झाली. मात्र, पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली.
-
जाफराबाद मेट्रो स्टेशन परिसरात आंदोलनाची तयारी सुरू असतानाच कपिल मिश्रा यांनी दुसरी शाहीन बाग तयार होऊ देणार असं ट्विट केलं होतं.
-
सोमवारीची सकाळ नेहमीप्रमाणं झाली. पण, अचानक दोन्ही गट समोरासमोर आले आणि दगडाचा पाऊसचं सुरू झाला. संतप्त झालेल्या दोन्हीकडील जमावानं वाहनं, घरं, दुकानांना लक्ष्य केलं. यात प्रचंड नुकसान झालं.
-
सकाळपासून सुरू झालेली जाळपोळ रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यात अनेक जखमी झाले. यात पोलिसांचाही समावेश होता.
-
जाफराबाद, मौजपूरमध्ये उसळलेली ही दंगल ईशान्य दिल्लीत परसली. यात सोमवारी सात जणांचा मृत्यू झाला. ज्यात एका पोलिसाचाही समावेश होता.
-
सोमवारी झालेल्या दंगलीचं भीषण स्वरूप मंगळवारपासून समोर यायला लागलं. अनेक घरं, दुकानं वाहनं यांची नासूधुस करण्यात आली. दगडफेक, गोळीबारात जखमींचा आकडा वाढत गेला. त्याचबरोबर मृतांचा आकडाही वाढला.
-
शाहरूख नावाच्या तरुणानं दगडफेकी दरम्यान अंदाधुंद गोळीबार केला. तब्बल सात राऊंड त्यानं फायर केले. या गोळीबारात अनेक जण जखमी झाले. तर चार जणांचा मृत्यू झाला.
-
या दंगलीचा फटका मेट्रोलाही बसला. अनेक पिंक लाईनवरील दहा मेट्रो स्थानक काही तासांसाठी बंद करण्यात आली. विशेष म्हणजे शांतता प्रस्थापित करण्यासाठी जमाव बंदीचे आदेशही जारी करण्यात आले.
-
सोमवारी परिस्थिती चिंताजनक झाल्यानं दिल्लीतील शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली. तर केंद्रीय मंडळाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या.
-
भाजपाचे नेते कपिल मिश्रा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ही दंगल पेटल्याचा आरोप करण्यात आला. तशी तक्रार या भागातील आपच्या नगरसेविकांनी पोलिसांना दिली.
-
दिल्ली पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर कपिल मिश्रा यांनी रस्त्यावर उतरून उत्तर देण्याचा इशारा दिला होता. दिल्लीतील हिंसाचार चालूच राहावा म्हणून हे आंदोलन केलं जात आहे. डोनाल्ड ट्रम्प परत जाईपर्यंत आम्ही शांत बसू. दिल्ली पोलिसांना आम्ही तीन दिवसांचा वेळ देतो. जाफराबाद आणि चांदबागचे रस्ते रिकामे करावे. केले नाही तर आम्हाला समजावू नका. मग आम्ही तुमचंही ऐकणार नाही. फक्त तीन दिवस,” असं कपिल मिश्रा यांनी व्हिडीओसह ट्विट केलं होतं.
-
सोमवारी भयानक हिंसा घडल्यानंतर मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त, गृहमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यांची बैठक घेतली. काही तासांच्या अंतरानं दोन बैठका शाह यांनी घेतल्या. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपराज्यपाल अनिल बैजल यांच्यासोबतही बैठक घेतली.
-
दंगल उसळलेल्या भागात प्रचंड सुरक्षा वाढवण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी या भागाची पाहणी केली. आतापर्यंत या दंगलीनं ३८ जणांचे बळी घेतले असून, अनेकांची उदरनिर्वाहाची साधनं जळून खाक झाली आहेत.
-
दंगलीत आयबी कर्मचारी अंकित शर्मा यांची निघृर्णपणे ह्त्या करण्यात आली. या हत्येत आपमधून निलंबित करण्यात आलेल्या ताहिर हुसेन यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला. पोलिसांनी ताहिर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला असून, या दंगलीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. न्यायालयानेही या घटनेवरून पोलिसांना फटकारले.
…अशी पेटत गेली दिल्ली; मन सुन्न करणारी दृश्य!
या दंगलीत ३८ जणांनी गमावला जीव
Web Title: Delhi violence horrible picture of violence bmh