• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. sonu smile zomato delivery boy goes viral on internet lays india puts photo on pack zomato changes dp sas

सोनू झळकला Lays च्या पाकिटावर, एका ‘स्माईल’मुळे रातोरात झाला स्टार

केवळ एका ‘स्माईल’मुळे सोनू रातोरात झाला स्टार…

March 2, 2020 11:22 IST
Follow Us
  • इंटरनेटच्या आजच्या जगात कधी कोण 'फेमस' होईल याचा काही नेम नाही. आता अशाचप्रकारे केवळ आपल्या एका स्माईलच्या जोरावर सोनू नावाचा एक तरुण प्रकाशझोतात आला आहे. (सर्व छायाचित्र सौजन्य - ट्विटर)
    1/15

    इंटरनेटच्या आजच्या जगात कधी कोण 'फेमस' होईल याचा काही नेम नाही. आता अशाचप्रकारे केवळ आपल्या एका स्माईलच्या जोरावर सोनू नावाचा एक तरुण प्रकाशझोतात आला आहे. (सर्व छायाचित्र सौजन्य – ट्विटर)

  • 2/15

    सोनू हा झोमॅटो या फूड डिलिव्हरी कंपनीचा एक डिलिव्हरी बॉय असून सध्या सोशल मीडियावर झोमॅटोच्या या ‘हॅप्पी रायडर’ची जोरदार चर्चा सुरूये.

  • 3/15

    एका स्माइलमुळे सोशल मीडियाला आपल्या प्रेमात पाडणाऱ्या सोनूचं निरागस हास्य पाहून झोमॅटोनेही त्याची दखल घेतलीये.

  • 4/15

    झोमॅटोने त्याचा व्हायरल झालेला फोटो चक्क आपल्या ट्विटर प्रोफाइलवर लावला आहे. सोनूचा फोटो प्रोफाईल फोटो म्हणून लावताना झोमॅटोने आता, "हे हॅप्पी रायडर फॅनचं अकाउंट आहे" असं ट्विट केलं.

  • 5/15

    त्यानंतर आता सोनूच्या स्माईलची भूरळ वेफर्स बनवणारी देशातील प्रसिद्ध कंपनी Lays India लाही पडली आहे.

  • 6/15

    Lays India ने थेट आपल्या चिप्सच्या पाकिटावरच सोनूचा फोटो वापरलाय. "एक स्माईलने कोट्यवधी लोकांचं हृदय जिंकता येतं", अशा मेसेजद्वारे Lays ने सोनूच्या फोटोसह चिप्सच्या पाकिटाचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलाय.

  • 7/15

    आता जाणून घेऊया कसा झाला व्हायरल :

  • 8/15

    सोनू झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय असून सर्वप्रथम danishansari81 या अकाउंटवरुन त्याचा एक टिकटॉक व्हिडिओ शेअर केला गेला.

  • या व्हिडिओमध्ये सोनूला त्याचा पगार किती असं कोणीतरी विचारतं. त्यावर सोनू आपल्या खास स्माईलसह १२ तासांच्या कामासाठी दररोज ३०० रुपये मिळतात असं उत्तर देतो.
  • 9/15

    "डिलिव्हरी करताना कोणत्याच ऑर्डरच्या बॉक्समधून काही काढून खात नाही. पण, ऑर्डर कँसल झाल्यावर मजा येते, कारण कॅंसल झालेल्या ऑर्डरचे आम्ही मालक असतो", असं सोनू व्हिडिओत बोलताना दिसतो.

  • संपूर्ण व्हिडिओमध्ये त्याच्या चेहऱ्यावरील हास्य तसुभरही कमी होत नाही. त्याचं हेच निरागस हास्य नेटकऱ्यांना भावलं.
  • 10/15

    सोनूचा हा व्हिडिओ फेसबुक, ट्विटरवर वेगाने व्हायरल होत असून त्याच्या स्माईलचं सर्वत्र कौतुक होतंय. अनेकांनी त्याची स्माइल क्यूट असल्याचं म्हटलंय.

  • 11/15

    इतक्या कमी पगारातही तो किती पॉझिटिव्ह आहे, अशा प्रतिक्रिया युजर्सच्या येत आहेत. तर काही जणांनी झोमॅटोकडे त्यांच्या रायडर्सचा पगार वाढवण्याची मागणी केली आहे.

  • 12/15

    ज्या स्माईलमुळे तो सोशल मिडियावर फेमस झाला होता, तीच स्माईल आता लेझ् च्या पाकिटांवर दिसणार आहे.

  • 13/15

    ( सोनूचा फोटो वापरुन पुणे पोलिसांनी केलेलं ट्विट)

Web Title: Sonu smile zomato delivery boy goes viral on internet lays india puts photo on pack zomato changes dp sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.