-
'बुलेट'ची निर्मिती करणारी ख्यातनाम कंपनी 'रॉयल एनफील्ड'ने भारतीय बाजारात BS6 इंजिनसह आपली Classic 350 ही लोकप्रिय बुलेट लाँच केलीये. (सर्व छायाचित्र सौजन्य – royalenfield.com)
-
ही बुलेट सिंगल चॅनल एबीएस (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम) फीचरसह लाँच करण्यात आली आहे.
-
यापूर्वी जानेवारी महिन्यात कंपनीने BS6 इंजिनसह ड्युअल चॅनल एबीएस असलेली क्लासिक 350 देखील लाँच केली आहे.
-
इंजिन : 'क्लासिक 350 बीएस 6 सिंगल चॅनल ABS'मध्ये BS6,346 सीसी, सिंगल-सिलिंडर, एअर-कुल्ड इंजिन आहे. यात फ्युअल इंजेक्शन तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे.
-
हे इंजिन 5250 आरपीएमवर 19.3 PS ची पावर आणि 4000 आरपीएम वर 28 Nm टॉर्क निर्माण करते. BS-4 मॉडेलच्या तुलनेत यातील आउटपुट कमी आहे.
-
'क्लासिक 350 बीएस 6 सिंगल चॅनल ABS' बुलेटला 5-स्पीड गिअरबॉक्स आहेत.
-
इलेक्ट्रॉनिक फ्युअल इंजेक्शन सिस्टिममुळे इंजिनच्या रिफाइन्मेंट, ड्राइव्हेबिलिटी आणि थंडीमध्ये बाइक स्टार्ट करण्याच्या क्षमतेत सुधारण्यास मदत होईल, असं कंपनीकडून सांगण्यात आलंय.
उत्तम परफॉर्मन्ससाठी पावर आणि टॉर्क डिलिव्हरीला ट्यून आणि ऑप्टिमाइझ करण्यात आल्याची माहितीही कंपनीने दिली. -
'क्लासिक 350 बीएस 6 सिंगल चॅनल ABS'भारतीय बाजारात विविध रंगांमध्ये उपलब्ध असेल.
यामध्ये अॅश, रेडडिच रेड आणि चेस्टनट रेड या रंगांचा समावेश आहे. तर, प्युअर ब्लॅक आणि मर्करी सिल्व्हर शेड कलरमध्ये या बुलेटची आधीपासूनच विक्री होत आहे. -
'क्लासिक 350 बीएस 6 सिंगल चॅनल ABS' बुलेट डिलरशिप्समध्ये पोहोचण्यास सुरूवात झालीये.
-
लवकरच या बुलेटच्या डिलिव्हरीलाही कंपनीकडून सुरूवात होणार आहे.
-
दुसरीकडे कंपनीने यापूर्वी जानेवारी महिन्यातच 'क्लासिक 350 बीएस 6 ड्युअल चॅनल ABS' असलेली बुलेटही लाँच केली. म्हणजेच आता 'क्लासिक 350' ही बुलेट बीएस 6 इंजिनसह सिंगल चॅनल व ड्युअल चॅनल ABS अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध झाली आहे.
-
या मॉडेलच्या लाँचिंगसोबतच आता 'क्लासिक 350 बीएस 6 सिंगल चॅनल ABS'ही कंपनीची भारतातील सर्वात स्वस्त बीएस-6 बुलेट ठरली आहे.
-
सर्व किंमती – (एक्स-शोरुम) आता लाँच झालेल्या 'क्लासिक 350 बीएस 6 सिंगल चॅनल ABS'बुलेटची किंमत 1.57 लाख रुपये आहे. तर, जानेवारी महिन्यात लाँच झालेल्या 'क्लासिक 350 बीएस 6 ड्युअल चॅनल ABS' बुलेटची किंमत 1.65 लाख रुपये आहे.
‘सर्वात स्वस्त’ BS6 बुलेट आली, ‘रॉयल एनफील्ड’ची Classic 350 लाँच झाली
‘रॉयल’ धमाका! ‘सर्वात स्वस्त’ बुलेट आली…
Web Title: Royal enfields most affordable classic 350 bs6 has been launched know price specifications and all other details sas