• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. rohit pawar share college days memories scsg

रोहित पवारांचा मुंबईत एक उनाड दिवस… गाडीवरील सॅण्डविच, लस्सी अन् बरंच काही

रोहित पवार यांनीच शेअर केले फोटो

March 10, 2020 12:44 IST
Follow Us
  • राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे सोशल नेटवर्किंगवर बरेच अक्टीव्ह आहेत. अनेकदा ते आपल्या फेसबुकपेजवरुन वेगवेगळ्या कार्यक्रमांचे, सोहळ्यांचे फोटो शेअर करत असतात. मात्र नुकतेच त्यांनी मुंबईमधील काही फोटो शेअर केले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील गेस्ट हाऊस परिसरामधील काही फोटो पोस्ट करत कॉलेजच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या फोटोंमध्ये रोहित पवार रस्त्याच्या बाजूला उभे राहून सॅण्डविच खाताना दिसत आहेत. याचबरोबर त्यांनी या परिसरातील आठवणीही शेअर केल्या आहेत. पाहूयात काय आहे रोहित पवार यांचे म्हणणे... (सर्व फोटो साभार: RohitPawarOfficial फेसबुक पेज)
    1/10

    राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे सोशल नेटवर्किंगवर बरेच अक्टीव्ह आहेत. अनेकदा ते आपल्या फेसबुकपेजवरुन वेगवेगळ्या कार्यक्रमांचे, सोहळ्यांचे फोटो शेअर करत असतात. मात्र नुकतेच त्यांनी मुंबईमधील काही फोटो शेअर केले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील गेस्ट हाऊस परिसरामधील काही फोटो पोस्ट करत कॉलेजच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या फोटोंमध्ये रोहित पवार रस्त्याच्या बाजूला उभे राहून सॅण्डविच खाताना दिसत आहेत. याचबरोबर त्यांनी या परिसरातील आठवणीही शेअर केल्या आहेत. पाहूयात काय आहे रोहित पवार यांचे म्हणणे… (सर्व फोटो साभार: RohitPawarOfficial फेसबुक पेज)

  • 2/10

    “कॉलेजमध्ये असताना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील गेस्ट हाऊसमध्ये जवळपास तीन वर्षे रहायला होतो. गेस्ट हाऊस ते कॉलेज हे तेंव्हा माझं विश्व असलं तरी या दरम्यानचा परिसरही माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला होता. आयुष्याच्या जडणघडणीत एका महत्त्वाच्या टप्प्यातून आपण जात असताना आजूबाजूच्या या वातावरणाचाही आपल्यावर नकळत परिणाम होत असतो आणि त्याच वातावरणात परत जाण्याची संधी मिळाली की मनाभोवती असंख्य आठवणी रुंजी घालू लागतात,” असं रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

  • 3/10

    मोबाईल दुरुस्तीसाठी फोर्ट परिसरात गेलो असताना कॉलेजमध्ये असतानाचे दिवस आठवले, असं सांगत त्यांनी या परिसरामध्ये फेरफटका मारला.

  • 4/10

    अभ्यास झाल्यानंतर काहीसा फेरफटका मारण्यासाठी गेल्यानंतर ज्या हॉटेलमध्ये लस्सी घ्यायला जायचो त्याच हॉटेलमध्ये जाऊन लस्सी घेण्याचा मोह मला आवरला नाही, असंही रोहित म्हणाले.

  • 5/10

    रस्त्याच्या कडेला असलेले फेरीवाले, सॅण्डविचचं हॉटेल, पेरु विक्रेते, भजे आणि वडा-पाव विक्रेते, फ्रुट डीश विक्रेते, रसवंती गृह पाहून तसंच अनेक वेळा पायाखाली घातलेले तेच फूटपाथ, तोच बस स्टॉप, रस्त्याने धावणाऱ्या त्याच टॅक्सी आणि त्याच बस हे सगळं पाहून मी आठवणींच्या विश्वास हरवून गेल्याचेही रोहित यांनी सांगितलं.

  • 6/10

    रोहित पवार यांनी . छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील त्यांच्या आवडत्या लस्सीचा फोटो शेअर केला आहे.

  • 7/10

    याच परिसरामध्ये रोहित पवार आणि त्यांचे मित्र मंडळी रस्त्याच्याकडेच्या वेगवेगळ्या स्टॉल्सवर आवर्जून जायचे.

  • 8/10

    अरे हे सगळं खूप छान होतं. अभ्यासाच्या जबाबदारीशिवाय अन्य कोणत्याही कामाचं ओझं मनावर नव्हतं. आज हा संपूर्ण परिसर तोच होता, पण त्यावेळी नेहमी सोबत असलेले मित्र-मैत्रिणी मात्र नव्हते. प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या असल्याने ते दिवस परत येणार नाहीत, मात्र त्यावेळचा आनंद हा कायमस्वरुपी राहणारा आहे हेही आनंददायीच नाही काय?, असंही रोहित यांनी या पोस्टच्या शेवटी विचारलं आहे.

  • 9/10

    रोहित पवार यांनी शेअर केलेला हा फोटो.

  • 10/10

    फेरीवाले, सॅण्डविचचं हॉटेल, पेरु विक्रेते, भजे आणि वडा-पाव विक्रेते, फ्रुट डीश विक्रेते, रसवंती गृह पाहून तसंच अनेक वेळा पायाखाली घातलेले तेच फूटपाथ, तोच बस स्टॉप, रस्त्याने धावणाऱ्या त्याच टॅक्सी आणि त्याच बस हे सगळं पाहून मी आठवणींच्या विश्वास हरवून गेलो असं रोहित पवार म्हणाले.

Web Title: Rohit pawar share college days memories scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.