• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. upsc ias topper rank 6 shubham guptas success story nck

Motivational : डहाणूच्या शुभमची यशोगाथा; दुकानात काम करत झाला IAS

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे…

March 14, 2020 11:00 IST
Follow Us
  • कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचं असेल तर ते काम लक्ष देऊन आणि मेहनत घेऊन केलं पाहिजे. यश हमखास मिळतं. म्हणूच म्हंटलं आहे की, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे... याचीच प्रचिती डहाणूच्या शुभमची यशोगाथा वाचल्यास तुम्हाला येईल...
    1/15

    कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचं असेल तर ते काम लक्ष देऊन आणि मेहनत घेऊन केलं पाहिजे. यश हमखास मिळतं. म्हणूच म्हंटलं आहे की, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे… याचीच प्रचिती डहाणूच्या शुभमची यशोगाथा वाचल्यास तुम्हाला येईल…

  • आर्थिक तंगी असताना वडिलांसोबत दुकानात काम करत अभ्यास करून शुभम गुप्ता IAS झाला. आजच्या सक्सेस स्टोरीमध्ये आपण डहाणूच्या शुभम गुप्ताची यशोगाथा पाहणार आहोत. शुभम गुप्ता २०१८ च्या बॅचचा टॉपर आहे. त्यानं All India Rank 6 मिळवलं आहे.
  • स्पर्धा परिक्षेला सामोर जाताना अनेक अडचणींचा विद्यार्थांना सामना करावा लागतो. यामध्ये कोणाला यश मिळतं तर कोण अर्ध्यातच हिंमत सोडून देतो. डहाणूच्या शुभम गुप्ताला चौथ्या प्रयत्नात यश मिळाल. पहिल्या तीन प्रयत्नात अपयश आल्यानंतरही शुभम डगमगला नाही..त्यानं आपले प्रयत्न सुरूच ठेवले.
  • शुभम मुळचा राजस्थानमधील जयपूरचा राहणारा आहे. त्याचं प्राथमिक शिक्षण जयपूरमध्येच झालं. शाळेत असतानाच त्याच्यातील गुण आई-वडिलांनी ओळखलं होतं. गरिब परिस्थितीतही शुभमने शिकण्याची आणि अभ्यासाची आपली जिद्द सोडली नाही.
  • आर्थिक परिस्थिती हालाकीची होती. परिस्थितीवर मात करण्यासाठी शुभमचं कुटुंब महाराष्ट्रात आलं. डहाणूमध्ये वास्तव्यास आल्यानंतर हायवेवर शुभमच्या वडिलांनी छोटसं दुकान टाकलं.
  • घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे शुभमचं शिक्षण असं तसंच पूर्ण झालं. एक्स्ट्रा क्लासेस साठीही पैसे नसल्यामुळे स्वत: च अभ्यास करत होता.
  • शुभमला वडिलांचं मार्गदर्शन नेहमीच प्रोत्साहीत करत होते. वडिलांना मदत करण्यासाठी शाळेतून आल्यानंतर शुभम दुकानावरही बसत असे.
  • 2/15

    दुकानावर काम करत करत आपलं वाचनही शुभम सुरूच ठेवत होता. गिऱ्हाईक नसताना फावल्या वेळात तो पुस्ताकांची पाने चाळत असे.

  • पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शुभमने UPSC कडे आपला मोर्चा वळवला. २०१५ त्यानं पहिल्यांदा स्पर्धा परिक्षा दिली. त्याला पूर्व परिक्षेतच अपयश आलं.
  • शुभमने आणखी मेहनत घ्यायचं ठरवलं आणि अभ्यासावर आणखी जोर दिला. पुन्हा एकदा शुभमनं परिक्षा दिली. यावेळी शुभमनं UPSC परिक्षा पास झाला होता. पण…
  • शुभमला स्वत:च्या कर्तुत्वावर विश्वास होता. म्हणून रँक कमी असल्यामुळे जॉइन केलं नाही.
  • शुभमने २०१७ मध्ये तिसऱ्यांदा UPSC परिक्षा दिली. पण त्याला त्यात अपयश आला. UPSCच्या पूर्व परिक्षेतच त्याला अपयश आलं.
  • शुभमनं आपला मनोधेर्य खचू दिलं नाही. पुन्हा एकदा नव्या जोमानं तयारी सुरू केली. २०१८ मध्ये शुभमने चौथ्यांदा परिक्षा दिली.
  • 3/15

    यावेळी शुभमनं सर्वांना दाखवून दिलं प्रयत्नांती परमेश्वर…कारण , देशभरात शुभम सहाव्या क्रमांकावर होता. कित्येक वर्षांच्या मेहनतीमुळे शुभम आता आयएएस झाला होता.

  • शुभम आपल्या या यशाचं श्रेय वडिलांना दोतो. तो म्हणतो…की, वडिलांच्या अपार कष्टामुळेच आज मी आयएएस झालोय. आर्थिक तंगी असतानाही त्यांनी माझं मनोधेर्य खचू दिलं नाही. सतत माझ्या पाठीशी उभे राहिले. (फोटो सौजन्य : फेसबुक)

Web Title: Upsc ias topper rank 6 shubham guptas success story nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.