• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. coronavirus what is difference between quarantine and isolation bmh

विलगीकरण व अलगीकरणमधील फरक समजला का?

अनेकांच्या मनात या दोन्ही गोष्टींविषयी संभ्रम आहे

March 19, 2020 11:43 IST
Follow Us
  • विलगीकरण व अलगीकरणमधील फरक समजला का?
    1/15

  • 2/15

    अलगीकरण (क्वारंटाइन) कक्ष म्हणजे जेथे संशयित रुग्णांना १४ दिवसांसाठी वेगळ्या वॉर्डमध्ये ठेवले जाते. येथे मास्कपासून, जेवण, वायफाय, औषधांसह सर्व सुविधा रुग्णालयात पुरविल्या जातात.

  • 3/15

    संशयितांना या दिवसात करोनाची लक्षणे आढळल्यास तातडीने विलगीकरण (आयसोलेशन) कक्षामध्ये ठेवले जाते. संशयित रुग्णांपासून इतरांना संसर्ग पसरू नये म्हणून प्रतिबंधात्मक काळजी म्हणून त्यांना वॉर्डमध्ये ठेवले जाते.

  • 4/15

    करोनाबाधित रुग्ण विलगीकरण कक्षामध्ये ठेवलेले असतात. त्यामुळे प्रत्यक्ष रुग्णांपासून त्यांना संसर्ग होण्याची शक्यता नसते. देशात परतल्यापासून १४ दिवसांनंतर कोणतीही लक्षणे न आढळल्यास आणि चाचणी नकारात्म्क आल्यास या रुग्णांना घरी सोडले जाते. (Photo : Reuters)

  • 5/15

    विलगीकरण कक्ष म्हणजे जेथे करोनाचा संसर्ग झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले असते अशा रुग्णांना स्वतंत्र ठेवले जाते. करोनाच्या संसर्गावर सध्या औषधे उपलब्ध नसल्याने त्यांना सर्दी, खोकला, ताप यावरील औषधे दिली जातात. (Photo : Reuters)

  • 6/15

    रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांपासून सर्वच कर्मचारी कक्षामध्ये जाताना विशेष काळजी घेतात. अलगीकरण आणि विलगीकरण हे पूर्णपणे वेगवेगळे वॉर्ड असतात. यातील रुग्णांचा एकमेकांशी संबंध येणार नाही, याची काळजी घेतली जाते.

  • 7/15

  • 8/15

    करोना हे विषाणूच्या एका समूहाचे नाव असून माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये आढळतो. हा विषाणू यापूर्वी माणसामध्ये आढळलेल्या सहा-सात विषाणूंपेक्षा वेगळा आहे. म्हणून याला नोवेल करोना विषाणू असे म्हटले आहे. या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असली तरी यातून पूर्णपणे बरे होणे शक्य आहे. (Photo : Reuters)

  • 9/15

    ‘करोना’चा संसर्ग कसा होतो? – रुग्ण खोकल्यावर हवेत उडालेल्या तुषारामध्ये करोनाचे विषाणू असतात. ही विषाणूयुक्त हवा श्वसनावाटे घेतल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात ते प्रवेश करू शकतात. (Photo : Reuters)

  • 10/15

  • 11/15

    कशी होते करोनाची चाचणी? – ही चाचणी करण्यासाठी प्रक्रिया केलेल्या कापसाच्या बोळ्यांचा (स्व्ॉब) वापर केला जातो. हा बोळा घशाच्या मागच्या भागातून आणि नाकपुडीतून फिरवला जातो. (Photo : Reuters)

  • 12/15

    संग्रहित

  • 13/15

    चाचणीची गरज कोणाला? – सध्या मुंबई, पुणे आणि नागपूर येथे करोनाची चाचणीची सुविधा उपलब्ध आहे. बाधित देशातून आलेल्या आणि करोनाची लक्षणे आढळलेल्या प्रवाशांनी तातडीने जवळील आरोग्य केंद्राशी संपर्क साधून चाचणी करणे गरजेचे आहे.

  • 14/15

    याव्यतिरिक्त करोनाबाधित रुग्णांच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्तींनीही चाचणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे बाधित देशातून प्रवास न केलेल्या आणि करोनाबाधित रुग्णाच्या थेट संपर्कात न आलेल्या व्यक्तींनी सर्दी, खोकला यासारखी लक्षणे आढळल्यास करोनाची बाधा झाली असेल या भीतीने चाचणी करण्यासाठी जाऊ नये.

  • 15/15

    सर्वाधिक धोका कुणाला? – ज्येष्ठ नागरिक, उच्च रक्तदाब, मधुमेहाचे रुग्ण, गर्भवती महिला, मूत्रपिंडाचे विकार, कर्करुग्ण ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते, अशा रुग्णांमध्ये संसर्गाचे स्वरूप गंभीर होण्याचा संभव असतो.

Web Title: Coronavirus what is difference between quarantine and isolation bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.