• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. coronavirus in india indian railways converts coach into covid 19 isolation ward bmh

भारतीय रेल्वेनं करून दाखवलं!

करोनाग्रस्त रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी महत्त्वाच पाऊल उचललं आहे.

March 31, 2020 18:50 IST
Follow Us
  • करोनाचा संसर्गाला आळा घालण्यासाठी संपूर्ण जग झटत आहे. भारतातही दिवसरात्र युद्धपातळी करोनाविरोधात उपाययोजना सुरू आहेत. करोनाग्रस्त आणि संशयितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं त्यांच्या उपचारांसाठी योजना हाती घेण्यात आली आहे. (फोटो : इंडियन एक्स्प्रेस आणि भारतीय रेल्वे)
    1/15

    करोनाचा संसर्गाला आळा घालण्यासाठी संपूर्ण जग झटत आहे. भारतातही दिवसरात्र युद्धपातळी करोनाविरोधात उपाययोजना सुरू आहेत. करोनाग्रस्त आणि संशयितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं त्यांच्या उपचारांसाठी योजना हाती घेण्यात आली आहे. (फोटो : इंडियन एक्स्प्रेस आणि भारतीय रेल्वे)

  • 2/15

    सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसाठी सर्वच स्तरातून मदतीचे हात पुढे येत आहे. यात ठप्प झालेली भारतीय रेल्वेही धावून आली आहे.

  • 3/15

    करोनाला वेळीच आळा घालता यावा आणि करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर वेळीच उपचार करता यावे यासाठी रेल्वेनं जुन्या बोगीमध्ये क्वारंटाइन आणि आयसोलेशन कक्ष तयार केले आहेत.

  • 4/15

    रेल्वेनं बोगींचं विलगीकरण कक्षात रुपांतर तयार केलं आहे.

  • 5/15

    यामध्ये सहा सीट असलेल्या भागांतील एका बाजूची मधली सीट, विरोधी बाजूच्या तीन सीट काढून टाकण्यात आल्या आहेत.

  • 6/15

    म्हणजे एका बाजूला दोन रुग्णांना दाखल करून घेता येणार आहे.

  • 7/15

    दोन रुग्णांमध्ये सुरक्षित अंतर राखता येईल अशा पद्धतीनं हे बदल करण्यात आले आहेत.

  • 8/15

    सीट बरोबरच रेल्वेच्या शौचालयातही बदल करण्यात आला आहे.

  • 9/15

    दिल्लीतील रेल्वे बांधणी डेपोत हे काम करण्यात आलं आहे.

  • 10/15

    आरोग्य विभागाच्या विशेष पथकाच्या देखरेखीखाली हे काम करण्यात आलं.

  • 11/15

    एका रेल्वेमध्ये अशा पद्धतीनं अलगीकरण आणि विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले.

  • 12/15

    आता अशाच पद्धतीनं इतर रेल्वेमध्ये हे बदल केले जाणार आहे. यासाठी जुन्या गाड्या वापरण्यात येणार आहे.

  • 13/15

    रेल्वेमध्ये हे बदल करण्याआधी या रेल्वेचं व्यवस्थित निर्जंतुकीकरण करण्यात येत.

  • 14/15

    भारतात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहेत. त्यामुळे रेल्वेनं अलगीकरण आणि विलगीकरण कक्ष वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 15/15

    रायबरेली आणि चेन्नई येथील रेल्वे कोच तयार करणाऱ्या कारखान्यांना तसे निर्देशही देण्यात आले आहेत. भारतीय वाहतुकीचा कणा असलेल्या रेल्वेनं करोनामुळे उद्भवलेल्या संकटाच्या काळात महत्त्वाचं काम करून दाखवलं आहे.

TOPICS
करोनाCoronaकरोना विषाणूCoronavirus

Web Title: Coronavirus in india indian railways converts coach into covid 19 isolation ward bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.