-
देशभरात सध्या करोना विषाणूमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊमुळे एरवी गजबजलेले मुंबईचे रस्ते आजकाल मोकळा श्वास घेत आहेत. (सर्व फोटो – प्रशांत नाडकर)
-
देशभरात बुधवारी हनुमान जयंती साजरी केली गेली, मात्र यावरही करोनाचं सावट दिसलं. दादरमधील पुरातन वटवृक्ष हनुमान मंदिर हे नेहमी भाविकांच्या गर्दीने गजबजलेलं असतं. मात्र आज या ठिकाणी फारशी माणसं दिसत नव्हती.
-
गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारने सर्व मंदिर, मशिदी, चर्च आणि इतर धार्मिक स्थळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
-
काही भाविकांनी आज मंदिराबाहेर येऊन हनुमानाचं दर्शन घेतलं आणि या परिस्थितीतून सर्वांची लवकर सुटका कर अशी प्रार्थना केली.
-
अद्याप करोना विषाणूवर ठोस औषध सापडलेलं नाही, वैद्यकीय यंत्रणा-शास्त्रज्ञ यावर लस तयार करण्याचं काम करत आहेत. मुंबईतही आज बाहेर पडताना मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
-
देशभरातील सध्याची परिस्थिती पाहता, लॉकडाऊन आणखी काही काळ वाढवण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
देवाक काळजी !
हनुमान जयंतीवरही करोनाचं सावट
Web Title: Temple of lord hanuman are closed amid coronavirus lockdown nationwide lockdown has been imposed in backdrop of coronavirus outbreak psd