-
घरून रुग्णालयापर्यंत जाऊ न शकणारे रुग्णांचे नातेवाईक आणि ज्यांच्यावर रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात उपचार केले जात आहेत असे जवळपास 50 रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक केईएम टाटा आणि अन्य रुग्णालयांमधून परळ येथील हिंदमाता उड्डाणपुलाखाली हलवण्यात आले आहेत. (सर्व छायाचित्रे – प्रशांत नाडकर)
-
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे.
-
आपली गावं सोडून रोजगारीसाठी मुंबईत दाखल झालेल्यांची यामध्ये अधिक फरपट होत आहे.
-
लॉकडाउनमुळे सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेवर निर्बंध आल्याने सामान्यांची कोंडी झाली आहे.
-
अनेकजण आहे त्या ठिकाणीच अडकले आहेत. अशा परिस्थितीत रुग्णालयांमधील रुग्णांच्या नातेवाईकांना मिळेल त्या ठिकाणी आसरा घ्यावा लागत आहे.
-
रुग्णालयांधील रुग्ण वाढत्या रुग्ण संख्येमुळे रुग्णालय प्रशासनास रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची अन्य ठिकाणी सोय करावी लागत आहे.
-
प्रशासनाला अशा नागरिकांच्या अन्न-पाण्याची सोय केली करावी लागत आहे.
जगण्याचा संघर्ष! करोनानं आणलं रस्त्यावर…
Web Title: Corona virus lockdown patients relatives from kem tata and other hospitals are shifted under hindmata flyover in parel mumbai sdn