-
पुणे : वेगानं विकसित होत असलेला लोहगाव या उपनगरीय भागात अनेक कामगार आणि मजूर राहतात. लॉकडाउनमुळे जेवणाचे हाल होत असलेल्या या स्थलांतरित कामगारांना सोमवारी संध्याकाळी लोहगाव पोलीस चौकीजवळ अन्न वाटप करण्यात आले. (सर्व छायाचित्रे – अरुल होरायझन)
-
स्थानिक बेरोजगार आणि स्थलांतरित अशा १५० लोकांना स्थानिक दात्याकडून मोफत अन्न वाटप करण्यात आले.
-
हे बेरोजगार आणि स्थलांतरित जवळपासच्या बांधकाम साईट्सवर काम करतात. मात्र, सध्या लॉकडाउनमुळे त्यांचे काम थांबले आहे.
-
काम थांबल्यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
-
पोलिसांनी यावेळी सोशल डिस्टंसिंगचे पालन होत आहे की नाही याबाबत खबरदारी घेत नियोजनात हातभार लावला.
-
आहे तिथेच थांबा, स्थलांतर करु नका असे शासनाने आवाहन केल्याने मोठ्या प्रमाणावर कामगावर वर्ग या भागात अडकून पडला आहे.
-
यामध्ये लहान मुलं, महिला, पुरुष तसेच वृद्ध व्यक्तींचाही समावेश होता.
-
अन्नदानाचा लाभ घेण्यासाठी या कामगार वर्गाने येथे मोठ्या प्रमाणावर रांग लावली होती.
-
यावेळी भात आणि फूड पॅकेट अशा स्वरुपात कामगारांना अन्नाचे वाटप करण्यात आले.
-
करोना विषाणूचा धोका टाळण्यासाठी यावेळी सर्वांनी तोंडाला मास्क आणि रुमाल बांधले होते.
-
त्याचबरोबर मोफत कलिंगडाचे वाटपही यावेळी करण्यात आले.
-
ही कलिंगडं घेण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
-
एका छोट्या टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणावर कलिंगड वाटपासाठी आणण्यात आली होती.
-
मोफत अन्न आणि फळाचे वाटप केल्याने अनेकांच्या पोटाला नक्कीच आधार मिळाला असेल.
Photos: भुकेल्या कामगार, मजुरांना लोहगावात अन्न-फळांचे वाटप
स्थानिक बेरोजगार आणि स्थलांतरित अशा १५० लोकांना स्थानिक दात्याकडून मोफत अन्न वाटप करण्यात आले.
Web Title: Photos allotment of food and fruits to the hungry workers and laborers in lohagaon aau