-
पुणे : करोनापासून काळजी घेण्यासाठी घराबाहेर पडू नका असे वारंवार आवाहन करुनही लोक विनाकारण बाहेर पडत असल्याचे चित्र पुण्यात ठिकठिकाणी पहायला मिळत आहे. अशा लोकांवर पोलीस आता मजेशीर पद्धतीने कारवाई करीत आहेत. (सर्व छायाचित्रे – पवन खेंगरे)
-
स्वारगेट येथील चेक पॉईंटवर अशा नागरिकांना अडवल्यानंतर त्यांना बराच वेळ रस्त्यावर बसून राहण्याची कडक शिक्षा देण्यात आली.
-
अत्यावश्यक कामांसाठी पोलिसांकडून ई-पासेस देण्यात येत आहेत.
-
आज दिवसभरात शहराच्या विविध भागात अशाच प्रकारे लोकांवर कारवाई करण्यात आली.
-
स्वारगेट परिसरात अशाच प्रकारे गुरुवारी मोठ्या संख्येने लोकं आपली वाहनं घेऊन घराबाहेर पडले होते. अशा १०० जणांना पोलिसांनी बराच वेळ रस्त्यावर बसवून ठेवले.
-
संचारबंदीचा आदेश असतानाही त्याचे उल्लंघन करुन लोक घराबाहेर पडत असल्याने सुरुवातीला पोलिसांनी लाठीचार्जचा कडक मार्ग अवलंबला होता. मात्र, आता त्यांनी थोडा मजेशीर, सौम्य पण कायम लक्षात राहिल अशी शिक्षा देण्यास सुरुवात केली आहे.
-
सकाळी कोंढवा, बिबवेवाडी, हडपसर, चतुश्रृंगी भागात मॉर्निंगवॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांवरही पोलिसांनी कारवाई केली. त्यांना उठाबशा आणि सूर्य नमस्कार घालण्यास भाग पाडले.
मोकाट घराबाहेर फिरणाऱ्यांना रस्त्यावर बसून राहण्याची शिक्षा
Web Title: Pune police has taken stringent view of citizens violating the lock down by taking out vehicles without having an e pass issued for those involved in essential services asy