जिल्हा परिषदेच्या शाळेत आपलं शिक्षण पूर्ण केलं. इंग्रजी येत नसल्यामुळे सतत अपमान सहन केला… पण जिद्द सोडली नाही. त्याच उमेद्दीने आयएएस आधिकारी होऊन टोमणे मारणाऱ्यांची तोडं बंद केली.. आजच्या सक्सेस स्टोरीमध्ये आपण मध्य प्रदेशच्या सुरभी गौतमची प्रेरणादायी स्टोरी पाहणार आहोत….. सुरभीचे वडील मैहर सिविल कोर्टमध्ये वकील आहेत आणि आई डॉक्टर सुशीला गौतम अमदरा येथे शाळेत शिक्षिका आहे. मध्य प्रदेशमधील अमदरा या छोट्याशा गावात सुरभीनं आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. (फोटो साभार – UpscTime फेसबूक पेज ) -
जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरभीनं शिक्षण घेतलं खरं पण.. इंग्रजी येत नसल्यामुळे सुरभीची टिंगल उडवली जात होती… (फोटो साभार : BcqmbewDbun इनस्टाग्राम )
सुरभीनं लहानपणीच कलेक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं आणि हे स्वप्न सत्यात उतरविण्याकरिता तमाम एशो आराम पासून दूर गेली. (फोटो साभार : surabhi.gautam.5055 फेसबुक ) -
आमदरा गावात वीज आणि पाणी या मुलभूत सुविधा नव्हत्या. त्यामुळे सुरभीला लहानपणी दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करावा लागला. (फोटो साभार :missionmpsc.com )
बारावीची परीक्षा चांगल्या गुणानं उतीर्ण झाल्यानंतर सुरभीनं इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा दिली अन् चांगल्या गुणानं उतीर्णही झाली. (फोटो साभार :missionmpsc.com ) सुरभीने भोपाळ येथून इलेक्ट्रोनिक आणि कम्युनिकेशन इंजिनियरिंगमध्ये पहिल्या क्रमांकाने पदवीचे शिक्षण पूर्ण केले. फोटो साभार : Sonu Gupta फेसबूक : -
त्यानंतर BARC मध्ये वैज्ञानिक म्हणून नौकरी केली. सुरभीने त्याचवेळी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्याच वर्षी सुरभीने आठ परीक्षा उतीर्ण केल्या. (फोटो साभार : thebetterindia.com )
-
यामध्ये SAIL, GATE, ISRO, MPPSC PRE,SSC LGL, Delhi Police आणि FCI इतक्या परीक्षा चांगल्या मार्काने पास केल्या. (फोटो साभार – Kiren Rijiju Facebook page )
-
२०१३ मधील IES परीक्षेत सुरभीने पूर्ण भारतातून पहिला नंबर मिळविला. आणि त्यानंतर आता २०१६ साली सुरभी संपूर्ण भारतात ५०वी rank मिळवून IAS झाली आहे. (फोटो साभार : Manish Sharma )
जिल्हा परिषदेची शाळा ते IAS अधिकारी, सुरभी गौतमची प्रेरणादायी स्टोरी
Web Title: Ias success story upsc civil services topper surabhi gautam got 50th rank in1st attempt nck