Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. pm narendra modis team fighting battle against coronavirus includes preeti sudan vk paul rajendra kumar and others experts nck

पंतप्रधान मोदींची ‘टीम करोना’; पाहा कोणाकडे आहे कोणती जबाबदारी

देशातील केंद्राच्या आधिकाऱ्यासह डॉक्टर, महामारी विशेषज्ञ, अर्थशास्‍त्र तज्ज्ञ, बायो-सायंटिस्‍ट्स आणि इकनॉमिस्‍ट्स यांचा समावेश

April 28, 2020 08:11 IST
Follow Us
  • संग्रहित छायाचित्र
    1/15

    संग्रहित छायाचित्र

  • 2/15

    करोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वोत्परी प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: लक्ष ठेवून आहेत. देशातील करोना महामारीचा आढावा घेण्यासाठी मोदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. करोना व्हायरसचा पराभव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास टीम तयार केली आहे. यामध्ये विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचा समावेश आहे.

  • या स्पेशल टीममध्ये देशातील केंद्राच्या आधिकाऱ्यासह डॉक्टर, महामारी विशेषज्ञ, अर्थशास्‍त्र तज्ज्ञ, बायो-सायंटिस्‍ट्स आणि इकनॉमिस्‍ट्स यांचा समावेश आहे. करोनाबाबतच्या निर्णयात मोदी यांना ही स्पेशल टीम मदत करते. पंतप्रधान मोदी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी या टीमसोबत चर्चा करतात आणि मगच निर्णय घेतात.
  • हेल्‍थ सेक्रटरी प्रिती सूदन यांना सोमवारी केंद्र सरकारने तीन महिन्यासाठी एक्‍सटेंशन दिलं आहे. करोना व्हायरससोबतच्या लढ्यात प्रिती यांचं योगदान मोलाचं आहे. देशातील प्रत्येक राज्यासोबत त्या संपर्कात असून करोनाचा पराभव करण्यासाठी नव्या योजना आखण्यात मोलाचा सहभाग आहे. केंद्राच्या प्रत्येत विभांसोबत प्रिती सूदन कोऑर्डिनेट करतात जेणेकरून सरकारची प्रत्येक पॉलिसी व्यवस्थीत लागू होईल. चीनमधील वुहानमध्ये अडकलेल्या ६४५ विद्यार्थांना सोडवण्यात प्रिती यांची भूमिका मोलाची होती. आंध्र प्रदेश कॅडरच्या १९८३ च्या बॅचच्या प्रिती यांनी आतापर्यंत राज्य आणि केंद्रात अनेक पदभार सांभाळले आहेत. जून २०१९ मध्ये प्रिती यांची हेल्‍थ सेक्रटरी पदावर नियुक्ती झाली होती.
  • 3/15

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये सेवानिवृत्त आयएएस अधिकारी प्रमोद कुमार मिश्रा यांना पदोन्नती देत प्रधान सचिव पदी नियुक्त केले होते. प्रधान सचिव पी.के मिश्रा या स्पेशल टीमला कोऑर्डिनेट करतात. मिश्रा १९७२ च्या बॅचचे गुजरात कॅडरचे आयएएस आधिकारी आहेत. विशेष म्हणजे गेल्या दोन दशकांपासून मोदी आणि मिश्रा एकमेकांना चांगल्या परिचयाचे आहेत. नरेंद्र मोदी यांनी २००१मध्ये पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा पी.के. मिश्रा हे मुख्यमंत्री कार्यालयात वरिष्ठ पदावर काम करत होते. यावेळी दोघांनी काही वर्षे सोबत काम केलेले आहे.

  • निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल करोना व्हायरसच्या टास्क फोर्सचे प्रमुख आहेत. इमर्जेंसी सर्विसेज, मेडिकल इक्विपमेंट्स आणि गोळ्या-औषधांची संबंधित राज्याकडे किंवा गरजूकडे पोहचवण्याची जबाबदारी पॉल यांच्याकडे आहे. पॉल आणखी एका टीमचे सदस्या आहेत जी करोनावर संशोधन करत आहे. यामध्ये संशोधक आणि वैज्ञानिक विभागांच्या आधिकाऱ्यांचा समावेश आहे.
  • कृष्णास्‍वामी विजयराघवन भारत सरकारचे प्रमुख सायंटिफिक एडवाएजर आहेत. विजयराघवन आणि पॉल साइटिफिक संस्थांना कोऑर्डिनेट करतात.
  • 4/15

    करोनाच्या लढाईत सर्वात पुढे इंडियन काउन्सिल ऑफ मेडीकल रिसर्चचे (ICMR) नाव सर्वात पुढे आहे. याचे संचालक बलराम भार्गव यांच्यावर करोना टेस्टिंगची व्यवस्था तसेच रूग्णांच्या डेटाची जबाबदारी देण्यात आली आहे. तुम्ही दररोज ऐकत असणाऱ्या करोनाशी निगडित आकडेवारी ICMR मार्फत केंद्राकडे जाणारी आकडेवारी आहे.

  • इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेच्या साथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे राष्ट्रीय प्रमुख पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांना आज देशातील प्रत्येक नागरिक ओळखतोय. करोनाच्या लढाईत पहिल्यापासूनच गंगाखेडकर सरकारचा चेहरा म्हणून पुढे आले आहेत.
  • 5/15

    ऑल इंडिया इंस्‍टीट्यूट ऑफ मेडिकल सायंसेज (AIIMS) चे संचालक रणदीप गुलेरिया हेल्‍थ एक्‍सपर्ट्स ग्रुपमध्ये आहेत. पंतप्रधानांच्या करोनाच्या लढाईत मेडिकलशी निगडित सर्व अपडेट यांच्यामार्फत येतात.

  • 6/15

    सी.के. मिश्रा १९८३ च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. यावेळी ते पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालयाचे सचिव म्हणून काम पाहत आहेत. करोना महामारीच्या लढ्यात त्यांच्याकडे या रोगावरील टेस्टिंग, रुग्णालये तयार करणे आणि क्‍वारंटाइन प्रक्रिया पाहतात.

  • पी.के मिश्रा यांच्या मदतीसाठी दोन सीनियर ब्‍यूरोक्रेट्स यांचा समावेश करण्यात आलाय. त्यापैकी १९८८ बॅचचे हरियाणा कॅडरचे आयएएस आधिकारी तरुण बजाज यांचा समावेश आहे. एक्सपर्टसोबत सतत संपर्कात असतात. बजाज यांना नुकतेच PMO तून बदली करून डिपार्टमेंट ऑफ इकनॉमिक अफेयर्समध्ये सचिव करण्यात आले आहे.
  • 7/15

    पी.के मिश्रा यांच्या मदतीसाठी असणारे दुसरे आधिकारी IAS एके शर्मा आहेत. एक्सपर्टसोबत ते सतत संपर्कात असतात. शर्मासध्या माइक्रो, स्‍मॉल अॅण्ड मीडियम एंटरप्राइजेजमध्ये सेक्रटरी आहेत.

  • NGOs आणि खासगी सेक्‍टरसोबत कोऑर्डिनेट करण्यासाठी स्पेशल टीम तयार करण्यात आली आहे. याचे प्रमुख निती आयोगाचेचे CEO अमिताभ कांत आहेत.
  • PMO मध्ये जॉइंट सेक्रेटरी असणारे गोपाल बागले एनजीओ आणि खासगी क्षेत्रांसोबत कोऑर्डिनेट करण्यासाठी अमिताभ कांत यांची मदत करतात.
TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Pm narendra modis team fighting battle against coronavirus includes preeti sudan vk paul rajendra kumar and others experts nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.