-
मुंबई : मुस्लिम धर्मियांचा रमजानचा पवित्र महिना सुरु असला तरी करोनाच्या सावटामुळं सर्वत्र शांतता आहे. त्यामुळे शहरातील प्रसिद्ध मिनारा मशिद परिसरही असा निर्मनुष्य बनला आहे. (सर्व छायाचित्रे – प्रशांत नाडकर)
-
रमजानच्या काळात नमाज पठण आणि खाद्य पदार्थांचे अनेक स्टॉल या भागात असल्याने हा भाग रात्री गर्दीनं फुलूनं गेलेला असतो. मात्र, यंदा भयाण शांतता आहे.
-
रमजानमुळं या मशिदीवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मात्र, लॉकडाउनमुळं त्याचा उत्साह दिसून येत नाही.
-
एरव्ही देखील अत्यंत गजबजलेला मिनारा मशिद परिसर सुनसान भासत आहे.
-
त्याचबरोबर शहरातील इतर भागांमध्ये देखील या रमजानच्या काळात अशीच परिस्थिती आहे.
-
यंदा रमजानच्या काळात सर्वच मशिदी बंद असल्यामुळे मुस्लिम बांधवांकडून घरातच नमाज पढला जात आहे.
-
रमजानच्या महिन्यात खाद्यपदार्थाची असंख्य दुकाने, फेरीवाले, मांसाहारी पदार्थाची रेलचेल असणाऱ्या महम्मद अली रोड आणि त्याच्या आजूबाजूच्या गल्ल्यांमधील चहलपहल या वेळी टाळेबंदीमुळे पूर्णत: थंडावली आहे.
-
एरव्ही रमजानच्या महिन्यात मुंबईच्या मुस्लीमबहुल भागात मोठी गर्दी उसळते. विशेषत: मिनारा मशीदच्या बाजूची गल्ली ही खाद्यपदार्थासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, सध्या सर्वकाही शांत आहे.
मिनारा मशिद परिसर थंडावला
Web Title: Coronavirus lockdown deserted roads minara masjid during holy month ramadan in mumbai sdn