-
मुंबई : लॉकडाउनच्या काळात नियमांचे उल्लघन करणाऱ्यांना रोखण्यासाठी शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांना कर्तव्यावर असताना काही काळ दिलासा मिळावा यासाठी व्हॅनिटी व्हॅनची सुविधा पुरवण्यात आली आहे. (सर्व छायाचित्रं – प्रशांत नाडकर)
-
जोगेश्वरी येथील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर रविवारी पोलिसांसाठी सज्ज असलेली व्हॅनिटी व्हॅन.
-
मुंबई पोलिसांना २० एप्रिलपासून या व्हॅनिटी व्हॅनची सुविधा पुरवण्यात आली आहे. या व्हॅन्सचा वापर कर्तव्यावर असलेले पोलीस खासकरुन महिला पोलीस करीत आहेत.
-
फिल्म मेकर्स ऑफ फ्रंटलाइन केअर, प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया आणि केतन रावल यांच्या सौजन्याने या करोनाच्या काळात मिशन सुरक्षा राबवण्यात येत आहे. या अंतर्गत या व्हॅनिटी व्हॅन मुंबई पोलिसांना उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
-
भर उन्हात रस्त्यांवर नाकाबंदी दरम्यान काम करणाऱ्या पोलिसांना काही काळ आराम करता यावा यासाठी या व्हॅनिटी व्हॅन्स पुरवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी तंबू आणि शेल्टर होम्स देखील तयार करण्यात आले आहेत.
-
पोलिसांना ज्या व्हॅनिटी व्हॅन्स पुरवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये तीन खोल्या आहेत.
-
पोलिसांसाठी पुरवण्यात आलेल्या व्हॅनिटी व्हॅन्समधील दोन खोल्यांचा वापर महिला पोलीस करतात तर एका खोलीचा वापर पुरुष पोलीस करीत आहेत.
-
संपूर्ण देशात अशा प्रकारच्या सुमारे ५०० व्हॅनिटी व्हॅन्स आहेत. यांपैकी एकट्या मुंबईमध्ये ३०० व्हॅन्स आहेत.
-
या व्हॅन्स बहुतकरुन वेबसिरीज आणि सिनेमाच्या शुटिंगदरम्यान वापरल्या जातात.
-
या सर्व व्हॅन्स केतन रावल यांच्या मालकीच्या आहेत.
दिवस रात्र राबणाऱ्या पोलिसांसाठी ‘व्हॅनिटी व्हॅन’ची सुविधा
Web Title: Mission suraksha mumbai police gets vanity vans for lockdown duty corona virus sdn