• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. know interesting facts about rohit sharma his journey dmp

PHOTOS: काय आहे रोहित शर्माचं डोंबिवली आणि नंबर 45 कनेक्शन

April 30, 2020 18:20 IST
Follow Us
  • भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार आणि अव्वल फलंदाज रोहित शर्माने आज ३३ व्या वर्षात पदार्पण केले. रोहित शर्माचा हा प्रवास युवा क्रिकेटपटूंसाठी खूपच प्रेरणादायी आहे. ( सर्व माहिती - क्रिकेट कंट्री वेबसाइट) (फोटो सौजन्य - रोहित शर्मा इन्स्टाग्राम)
    1/15

    भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार आणि अव्वल फलंदाज रोहित शर्माने आज ३३ व्या वर्षात पदार्पण केले. रोहित शर्माचा हा प्रवास युवा क्रिकेटपटूंसाठी खूपच प्रेरणादायी आहे. ( सर्व माहिती – क्रिकेट कंट्री वेबसाइट) (फोटो सौजन्य – रोहित शर्मा इन्स्टाग्राम)

  • 2/15

    एका सामान्य कुटुंबातून आलेल्या मुलाने आज हे यशाचे शिखर गाठले आहे. वडिलांचे महिन्याचे उत्पन्न जास्त नव्हते. त्यामुळे बोरिवलीत राहणाऱ्या आजी-आजोबा, काका-काकूंकडे रोहित लहानाचा मोठा झाला.

  • 3/15

    एका क्रिकेट शिबिरात प्रवेश घेतल्यानंतर १९९९ साली रोहितच्या क्रिकेट प्रवासाला सुरुवात झाली.

  • 4/15

    क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांनी रोहितमधली प्रतिभा हेरली व त्याला घडवले. रोहित सुरुवातीची काहीवर्ष डोंबिवलीमध्ये होता. रोहितचे आई-वडिल डोंबिवलीत रहायचे. तो डोंबिवलीतल्या शाळेमध्ये होता. त्यावेळी प्रशिक्षक दिनेश लाड यांनी क्रिकेट करिअरच्या दृष्टीने त्याला बोरिवलीच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश घ्यायला सांगितला.

  • 5/15

    रोहितच्या आई-वडिलांना बोरिवलीमधील त्या शाळेची फी परवडणारी नव्हती. पण शाळा प्रशासनाने रोहितचे क्रिकेटमधले टॅलेंट हेरुन त्याला फी माफी दिली.

  • 6/15

    रोहित शर्माची आई आंध्र प्रदेश विशाखापट्टणमची आहे. तेलगू ही रोहितच्या आईची मातृभाषा आहे. आईकडून तो तेलगू भाषा शिकला आहे. बराच काळ मुंबईत राहूनही रोहित तेलगू भाषेमध्येही बोलू शकतो.

  • 7/15

    २००५ साली देवधर करंडक स्पर्धेमधून रोहित शर्मा हे नाव चर्चेत आले. त्यावेळी राजस्थान उदयपूरमध्ये वेस्ट झोनकडून खेळताना रोहितने उत्तर झोन विरुद्ध १४३ चेंडूत १४२ धावा केल्या.

  • 8/15

    रोहितचे कुटुंब पूर्णपणे शाकाहारी आहे. अंडही त्यांच्या घरामध्ये चालत नाही. घराबाहेर असताना डायटची आवश्यकता म्हणून रोहित अंडी खातो. पण घरच्या परंपरा, नियम कधीही मोडत नाही.

  • 9/15

    सचिन तेंडुलकरने २००३-०४ मध्य रोहितला ज्यूनिअर क्रिकेटर ऑफ द इअरचा अवॉर्ड प्रदान केला होता. रोहितला सचिनला बघून लहानाचा मोठा झाला होता. त्यामुळे त्याच्यासाठी सचिनकडून पुरस्कार स्वीकारणे हा खास क्षण होता. विरेंद्र सेहवागला भेटण्यासाठी त्याने एकदा शाळाही चुकवली होती.

  • 10/15

    रोहितच्या आयुष्यात ४५ नंबरला विशेष स्थान आहे. हा फक्त रोहितच्या जर्सीचा नंबर नाही. त्याच्या गाडयांचाही हाच नंबर आहे.

  • 11/15

    रोहित शर्माने वनडेमध्ये ३ द्विशतके केली आहेत. असा पराक्रम करणारा तो पहिला आणि सध्यातरी एकमेव क्रिकेटपटू आहे. आत्तापर्यंत वनडेमध्ये केवळ ६ खेळाडूंना द्विशतक झळकावण्यात यश आलं आहे. त्यातील रोहित व्यतिरिक्त अन्य ५ खेळाडूंनी केवळ एकदा द्विशतक केले आहे.

  • 12/15

    रोहितच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ४ शतकांची नोंद आहे. २०१५ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० सामन्यात रोहितने पहिल्यांदा शतक झळकावलं. या सामन्यात रोहितने १०६ धावा केल्या होत्या. यानंतर २०१७ साली श्रीलंकेविरुद्ध ११८ धावा, २०१८ साली विंडीज आणि इंग्लंडविरुद्ध अनुक्रमे १११ आणि १०० धावांची खेळी केली होती.

  • 13/15

    कोलकात्याच्या मैदानात रोहित शर्माने लंकन गोलंदाजांची धुलाई करताना १७३ चेंडूत ३३ चौकार आणि ९ षटकारांच्या सहाय्याने २६४ धावा कुटल्या होत्या. वन-डे क्रिकेटच्या इतिहासातली ही सर्वोत्तम धावसंख्या मानली जाते. या खेळीत रोहितने १८६ धावा या नुसत्या चौकारांवर वसुल केल्या होत्या.

  • 14/15

    आयपीएलमध्ये ५ विजेतेपद जिंकणारा रोहित शर्मा एकमेव खेळाडू आहे. २००९ साली डेक्कन चार्जर्स संघाकडून एकदा तर २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ या चार वर्षांत मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे.

  • 15/15

    इंग्लंडमध्ये २०१९ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माने ५ शतकं झळकावली होती. याआधी कोणत्याही खेळाडूला अशी कामगिरी करता आलेली नव्हती. ५ शतकांच्या सहाय्याने रोहितने या स्पर्धेत ६४८ धावा केल्या होत्या.

Web Title: Know interesting facts about rohit sharma his journey dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.