-
लॉकडाउनमुळे आपल्या घरापासून दूर मुंबईत अडकलेल्या मजुरांना अखेरीस केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वे विभाग या कामगारांसाठी खास रेल्वे गाड्या सोडत आहे. ( सर्व छायाचित्र – प्रशांत नाडकर)
-
हातावर पोट असणाऱ्या या कामगारांचे लॉकडाउन काळात प्रचंड हाल झाले. रोजगार तुटला, राहण्यासाठी धड निवारा नाही अशा परिस्थितीत अनेक मजुरांना रस्त्यावर दिवस काढायला लागले.
-
पण अखेरीस सरकारने गावाला परत जाण्याची परवानगी दिल्याने या कामगारांना जरा हायस वाटतंय. वडाळ्यातील भारतीय कमला नगर भागात बाहेर जाण्यासाठी मिळणाऱ्या फॉर्म स्वीकारण्यासाठी झालेली कामगारांची गर्दी
-
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने सोशल डिस्टन्सिंग पाळायला सांगितलं आहे….पण घरी जायची ओढ इतकी मोठी आहे की या नियमांचा कामगारांना विसर पडतो
-
करोनाचा सामना करताना या कामगारांनी गेल्या काही दिवसांत इतक्या हालअपेष्टा सोसल्या आहेत, की आता उन्हात उभं राहून फॉर्मची वाट पाहणं यांना फारसं कठीण वाटत नाही.
-
तरीही शक्य होईल तितकं सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्याचा प्रयत्न कामगार करत आहेत.
-
फॉर्म मिळवण्याची रांग खूप मोठी आहे, त्यामुळे माझा नंबर कधी येणार ही भावना प्रत्येक कामगाराच्या चेहऱ्यावर असते
-
आता काहीही झालं तरी शहर सोडायचं आणि आपलं गाव गाठायचं या एका भावनेतून हे कामगार तग धरुन आहेत.
-
प्रवासाच्या परवानगीसाठीचा फॉर्म मिळाल्यानंतर कामगारांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा काही औरच असतो.
…आपला गावच बरा ! मुंबई सोडण्यासाठी कामगारांची गर्दी
प्रवास करण्याला केंद्र सरकारची परवानगी
Web Title: Migrant workers in mumbai que to collect permission form to travel their native villages psd