-
जगभरातील चित्रपटप्रेमींच्या पसंतीस उतरलेला ऑस्करविजेता हॉलिवूड सिनेमा अवतारचा आता सिक्वल येणार आहे. जेम्स कॅमेरुन हेच या सिक्वलचं दिग्दर्शन करणार आहेत. (All Photo: Avatar/Twitter)
-
या सिनेमाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन या सिनेमाची पडद्यामागील काही छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
-
अवतारच्या सिक्वलमधील काही दृश्यांचे अंडरवॉटर चित्रिकरण सुरु असतानाचे फोटोही त्यांनी शेअर केले आहेत.
-
पहिल्या सिनेमात पृथ्वीबाहेरच्या काल्पनिक पँडोरा ग्रहावरील वैशिष्ट्यपूर्ण जीवन दाखवण्यात आलं होतं. इथली माणसं ही आपल्यापेक्षा वेगळी होती. निळा रंग, उंच शरीरयष्टी आणि आपल्यापेक्षा सक्षम असणारी ही माणसं पडद्यावर पाहतानाचा रोमांचकारी अनुभव होता.
-
पहिला अवतार सिनेमा हा दृश्य चमत्कार होता. विशेषतः थ्रीडीमध्ये हा सिनेमा जबरदस्त दिसत होता. अवतारच्या सिक्वेलमधूनही पुन्हा अशी जबरदस्त ट्रीट प्रेक्षकांना मिळणार आहे.
-
या दृश्यात पँडोरावरील दऱ्या-खोऱ्या, नद्या, सावल्या हे इतकं भव्यदिव्यं स्वरुपात दाखवण्यात आलं आहे. त्यामुळं सिनेमाच्या क्षेत्रातील कालत्मकतेचं हे एक मोठं काम ठरलं आहे.
-
अवतारच्या सिक्वलमध्ये पँडोरा कसा दिसेल याचे हे एक दृश्य विलोभनीय आहे. हे पाहून तुम्हाला कदाचित पुन्हा पृथ्वीवर परत यावसं वाटणार नाही किंवा तुम्ही पृथ्वीवरच अशी ठिकाणं शोधण्याचा प्रयत्न कराल.
-
अवतारच्या सिक्वलच्या सेटवर असलेले चित्रपटाचे निर्माते जॉन लँडाऊ, सिगर्नी वेवर आणि जॉईल डेव्हिड मूरे.
-
'अवतार २' हा सिनेमा १७ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. जर करोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात येऊन शुटींग व्यवस्थित सुरु झाल्यास हे शक्य होणार आहे.
ऑस्करविजेत्या ‘अवतार’चा येणार सिक्वल; शुटिंगदरम्यानचे पाहा फोटो
‘अवतार २’ हा सिनेमा १७ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. जर करोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात येऊन शुटींग व्यवस्थित सुरु झाल्यास हे शक्य होणार आहे.
Web Title: Avatar sequels behind the scenes photos here is how james camerons films are going to be aau