-
लॉकडाउनमध्ये अडकलेल्या परप्रांतीय कामगारंसाठी केंद्र सरकारने अखेरीस रेल्वे गाड्यांची सोय केली आहे. (सर्व छायाचित्र – अरुल हॉरिझॉन)
-
पुण्यात अडकलेल्या मध्य प्रदेशातील कामगारांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी एक गाडी रेवा च्या दिशेने रवाना झाली.
-
या गाडीतून प्रवास करण्यासाठी उरळी स्थानकात सुमारे १ हजार कामगार तयार होते.
-
रेल्वे पोलीस आणि अधिकाऱ्यांकडून या कामगारांसाठी खास सोय करण्यात आली होती. सोशल डिस्टन्सिंगने नियम पाळत सर्वांना पाळीपाळीने रेल्वे स्थानकात सोडण्यात येत होतं.
-
रणरणत्या उन्हात आडोसा शोधत थोडावेळ आराम करणारा कामगार
-
आपलं सर्व सामानसुमान बांधत या कामगारांनी आता आपल्या घराकडची वाट पकडली आहे.
-
रेल्वे स्थानकात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा विशेष बंदोबस्त असतो.
-
येणाऱ्या प्रत्येक कामगाराचं इथे थर्मल चेकिंग केलं जात आहे.
-
रेल्वे स्टेशनवरही डिस्टन्सिंगचा नियम पाळला जाईल याची काळजी पोलीस अधिकारी घेत आहेत.
-
प्रवासासाठीचं तिकीट, पाण्याची बाटली आणि डोक्यावर सामान घेऊन गाडीत बसण्यासाठी वाट पाहणारी महिला
-
गाडीत शिरलो, बसायला खिडकीकडची जागा मिळाल्यानंतर आपलं तिकीट दाखवताना एक कामगार
-
गेले अनेक दिवस आपल्या घरापासून दूर अडकलेल्या कामगारांच्या जीवात जीव आलेला पहायला मिळाला
-
गाडीत बसायला जागा मिळाल्यावर लगेचच आपल्या घरच्यांना फोन करुन आपली ख्यालीखुशाली कळवणं प्रत्येकाने महत्वाचं समजलं.
-
काही जणांनी जागा मिळाल्यावर थेट पाय पसरत आपल्या घरच्यांना फोन करुन आपली ख्यालीखुशाली कळवण्यास सुरुवात केली
-
घरी जायला मिळणार हा आनंद या कामगारांच्या चेहऱ्यावर साफ दिसतो आहे
-
गाडीत जागा मिळाली आता प्रतीक्षा गाडी स्टेशन कधी सोडते याची…
-
गेले काही दिवस करोना विषाणूमुळे कामगार वर्गाला अनेक त्रास सहन करावे लागले आहेत.
-
मात्र हे सर्व त्रास बाजूला ठेवत आता घरी जायचं एवढंच यांच्या डोक्यात आहे.
-
कामगारांसाठी खाण्या-पिण्याची सोय रेल्वे विभागातर्फे करण्यात येत आहे
-
खाण्याचं सामान तपासताना रेल्वेचे अधिकारी
-
जागा मिळालेल्या प्रत्येक कामगाराची रेल्वे अधिकारी, पोलीस अधिकारी चौकशी करत आहेत.
-
पुढच्या प्रवासासाठी या कामगारांना जेवण देण्यात आलं.
-
प्रवास मोठा आहे, त्यामुळे काही कामगार आपल्या जवळील रिकाम्या बाटल्यांमध्ये पाणी भरुन घेत आहेत, पण इथेही एक नजर गाडीवर कायम असते….सध्याचा काळ हा खडतर आहे, आपल्याला सोडून गाडी जाणार नाही ना ही काळजी प्रत्येकाच्या मनात असतेच
-
रेल्वे स्थानकावर पाणी पिणारा एक कामगार
-
गेल्या काही दिवसांत या कामगारांनी सोसलेला त्रास शब्दांत मांडणं खरंच कठीण आहे
-
अखेरीस गाडीला हिरवा झेडा दाखवण्यात येतो आणि गाडीचा प्रवास सुरु होतो
-
लहानगा मुलगा आपल्या पालकांसह पुणे शहराला अलविदा करताना…
-
प्रत्येक कामगारांनी या संकटकाळात आपली काळजी घेणाऱ्या अधिकाऱ्यांचे आभार मानले
-
रेल्वे अधिकाऱ्यांनीही कामगारांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
-
उरळी स्टेशन सोडताना आनंदाने घोषणा देणारे कामगार
-
मुंबई असो किंवा पुणे कष्टकऱ्यांच्या याच हाताच्या जोरावर शहरं चालतात. आज तेच हात आपल्या मुळ गावी परतत आहेत, कदाचित कधीही परत न येण्यासाठी. भविष्यात काय होईल ते काळच ठरवेल पण सध्या तरी या कामगारांनी आमुचा राम-राम घ्यावा असंच या शहराला म्हटलं असेल.
आमचा राम-राम घ्यावा !
पुणे शहरातील कामगारांना घेऊन विशेष रेल्वे मध्य प्रदेशला रवाना
Web Title: First shramik express from pune departed for rewa in madhya pradesh on thursday evening psd