-
आज बुद्ध पौर्णिमा. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं आज पूर्णाकृती चंद्राचं खुललेलं रुप पाहायला मिळालं. (सर्व फोटो – अमित चक्रवर्ती)
-
वैशाख शुद्ध पौर्णिमेला गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं होतं. म्हणून ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी करण्यात येते
-
भगवान बुद्ध यांचा जन्म इ.स.पू. ५४३ मध्ये लुम्बिनी येथे झाला होता. सध्या हे ठिकाणी नेपाळमध्ये आहे. भगवान बुद्धांनी जगाला एक नवा दृष्टीकोन दिला.
-
भगवान बुद्धांना बिहारमधील बोधगया येथे असलेल्या बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली.
-
वैशाख पौर्णिमेच्याच दिवशी कुशीनगरमध्ये त्यांचं महापरिनिर्वाणही झाले.
-
जगातील दु:ख नष्ट करण्यासाठी भगवान बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले होते.
-
भगवान बुद्धांनी त्यासाठी स्वत:चं घरदार सोडून ध्यान आणि तपश्चर्येचा मार्ग स्वीकारला होता.
-
वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली आणि दु:खाचं मूळ तसंच दु:ख नाहीसं करण्याचा मार्गही सापडला होता.
-
भारताबरोबरच हा दिवस चीन, नेपाळ, सिंगापूर, व्हिएतनाम, थायलंड, जपान, कंबोडिया, मलेशिया, श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया, यांसारख्या देशांमध्ये साजरा केला जातो.
-
श्रीलंका आणि इतर दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये या दिवसाला 'वैसाक' असं संबोधलं जातं. हा शब्द वैशाख या शब्दाचा अपभ्रंश आहे.
Photo : देखो चाँद आया …!
Web Title: Full moon on the occasion of buddha purnima on thursday jud