• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. artist named sumit patil create beautiful photo shoot by using traditional kitchen items to celebrate mothers day psd

स्वयंपाकघरातली आई

मराठमोळ्या कलाकारानं मांडलं आईचं अनोखं रुप

May 10, 2020 11:22 IST
Follow Us
  • संपूर्ण जगभरात आज मातृ दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. आपल्यासाठी नेहमी खस्ता खाणाऱ्या आईचा सन्मान करण्यासाठी १० मे हा दिवस मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. मराठी सिने-नाटक इंडस्ट्रीत काम करणाऱ्या सुमित पाटील या तरुणाने मदर्स डे निमीत्त एक भन्नाट संकल्पना अमलात आणली आहे.
    1/9

    संपूर्ण जगभरात आज मातृ दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. आपल्यासाठी नेहमी खस्ता खाणाऱ्या आईचा सन्मान करण्यासाठी १० मे हा दिवस मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. मराठी सिने-नाटक इंडस्ट्रीत काम करणाऱ्या सुमित पाटील या तरुणाने मदर्स डे निमीत्त एक भन्नाट संकल्पना अमलात आणली आहे.

  • 2/9

    काळानुरुप स्वयंपाक घरातून नामशेष होत चाललेल्या दगड, पितळ, तांब्यापासून बनवण्यात आलेल्या साधनांना सुमीतने आईचं स्वरुप दिलं आहे. हे खास फोटोशूट त्याने सोशल मीडियावर शेअर केलंय.

  • 3/9

    आजच्या पिढीतील अनेकांना जातं ही संकल्पना माहिती नसेल, पूर्वीपासून धान्य दळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या वस्तूला सुमितने रांगोळी आणि फुलांच्या सहाय्याने आईचं स्वरुप दिलं आहे. (संकल्पना आणि फोटो सौजन्य – सुमित पाटील)

  • 4/9

    धान्य निवडण्यासाठी आजही अनेक घरात सुप आणि रोवळीचा वापर होतो, या वस्तूलाही सुमितने सुंदर स्वरुपात मांडलं आहे.

  • 5/9

    आपल्या आईकडून मिळालेली वस्तू म्हणून आई अनेकदा जुन्यातला जुना पाटा-वरवंटा जपून ठेवते. या भावनेला सुमितने सुंदर पद्धतीने मांडलं आहे.

  • 6/9

    जुन्या काळात स्वयंपाक घरात वापरले जाणारे चमचे

  • 7/9

    आधुनिक जगात विळीची जागा चॉपर आणि अत्याधुनिक साधनांनी घेतली असेलही, पण आई ज्या पद्धतीने विळीवर भाजी चिरते त्याला कशाचीही सर येणार नाही.

  • 8/9

    दिवाळीत चकली, करंज्या तयार करण्यासाठी वापरली जाणारी भांडी, म्हणजे प्रत्येक आईचा जीव की प्राण

  • 9/9

    तांब्या-पितळ्याची भांडी, कळशी तर आता जवळपास हद्दपार होत आहेत. पण घरातल्या एका भांड्यात मग आपल्याला अचानक आपली आई दिसू लागते.

TOPICS
मदर्स डे २०२४Mothers Day 2024

Web Title: Artist named sumit patil create beautiful photo shoot by using traditional kitchen items to celebrate mothers day psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.