जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर शेतकऱ्याचा मुलगा IAS आधिकारी झाला आहे. आजच्या सक्सेस स्टोरीमध्ये बुलंदशहरच्या वीर प्रताप सिंह याची सक्सेस स्टोरीबद्दल जाणून घेणार आहोत. २०१८ मध्ये आयएएस झालेल्या वीर प्रताप सिंह याला कधीच आर्थिक तंगीचा सामना करावा लागला नाही. कारण त्याच्या वडिलांनी कर्ज घेऊन मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलला. एकीकडे शेतात काहीही पिकत नसताना मुलाला आधिकारी करण्यासाठी जिद्दीच्या जोरावर शेतकरी बापानं कर्ज घेऊन मुलाला शिकण्यासाठी प्रोत्साहित केलं. वीर प्रताप सिंह यांनी एका फेसबूक पोस्ट टाकत त्याच्या संघर्षाचा प्रवास वर्तवला होता. तेव्हापासून सोशल मीडियावर त्याच्या सक्सेसची चर्चा सुरू आहे. तो म्हणला होता की, यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो. २०१८ मध्ये वीर प्रताप सिंह यांनी देशात ९२ वी रँक मिळवली होती वीर प्रताप सिंह तिसऱ्या प्रयत्नात आयएएस झाला. २०१६ आणि २०१७ मध्ये त्याला अपयश आले होते. वीर प्रताप सिंहने २०१५ मध्ये अलीगढ मुस्लिम यूनिवर्सिटीमधून बीटेक पूर्ण केलं आहे. वीर प्रताप सिंह राघवच्या मोठ्या भावालाही आयएएस व्हायचं होतं पण परिस्थिती अभावी शिक्षण सोडून नोकरी करावी लागली. वीर प्रताप सिंहला आयएएस होण्यासाठी मोठ्या भावाचेही मार्गदर्शन मिळालेय. वीर प्रताप सिंहला लहानपणी शिक्षणासाठी पाच किमी पर्यंतचा प्रवास पायी करावा लागत होता. गावाच्या जवळपास शाळा नव्हती आणि शेजारील गावात शाळा होती मात्र पोहचण्यासाठी कोणतेही वाहन नसल्यामुळे भावाबरोबर वीर प्रताप सिंह चालत शाळेला जात असे. वीर प्रताप सिंह आज अनेक तरूणाचा आदर्श आहे. त्याचा संघर्ष शब्दात मांडता येणं कठीण आहे. पण जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर त्यानं वडिलांचं नाव कमावलं असं म्हणायला हरकत नाही.
कर्ज काढून UPSC ची तयारी, शेतकऱ्याचा मुलगा असा झाला IAS
जिद्द, चिकाटी आणि मेहनतीचे ‘फळ’
Web Title: Ias success story of pratap singh raghaw nck