• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. jaipur balika badhu married at 8 yr rupa yadav mbbs career success story nck

पतीनं ऑटो चालवून शिकवलं; बालविवाह झालेली मुलगी बनली डॉक्टर

अवघ्या आठव्या वर्षी झालं होतं लग्न…

May 14, 2020 08:43 IST
Follow Us
    • असं म्हणतात की चिकाटी, मेहनत आणि निरंतर प्रयत्नाच्या जोरावर नशीबही बदलता येतं. याचेचं एक उत्तम उदाहरण जयपूरमधील महिला डॉक्टर आहे. (फोटो सौजन्य : newsalertindia )
    • तिसऱ्या वर्गात असताना अवघ्या आठव्या वर्षी बालविवाह झाला. पण मेहनत चिकाटी आणि पतीच्या पाठिंब्यामुळे डॉक्टर झाली.. आजच्या सस्केस स्टोरीमध्ये आपण जयपूरच्या डॉ. रूपा यादवचा संघर्ष पाहणार आहोत..
    • परिस्थिती अभावी रूपा यादव यादवचं आठव्या वर्षीच लग्न झालं. तिने संसारही सुरू केला. घरातील आणि शेतामधील काम करत असताना रूपाने आपलं शिक्षण सुरूच ठेवलं. (फोटो सौजन्य : newsalertindia )
    • हे सर्व करत असताना रूपाला खंबीर साथ मिळाली ती नवऱ्याची आणि कुटुंबाची. पतीनं लोक काय म्हणतील याचा विचार न करता ऑटो चालवून आणि शेतमजूरी करून रूपाच्या शिक्षणाचं स्वप्न पूर्ण केलं.
    • रूपानंही डॉक्टर व्हायचं ठरवलं होतं. ते स्वप्न तिने पूर्ण केलं. दोन वर्ष दिवसरात्र अभ्यास करून रूपाने नीट-२०१७ परिक्षेत ६०३ गुण मिळवलं. (फोटो सौजन्य : newsalertindia )
    • बालविवाह झालेल्या जयपूरमधील छोट्याशा गावातील मुलीनं जयपूरचं नाव मोठं केलं होतं. नीटमधील गुणांमुळे रूपाला सरकरी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. (फोटो सौजन्य : newsalertindia )
    • 1/10

      रूपा सांगते की, जयपूरमधील करेरी गावांत पाच जुलै १९९६ रोजी माझं लग्न झालं. त्यावेळी मी तिसऱ्या वर्गात शिकत होते. माझी मोठी बहिण रूक्मादेवी आणि माझं लग्न एकाच मांडवात झालं. (फोटो सौजन्य : newsalertindia )

    • त्यावेळी लग्न म्हणजे काय? याची कल्पनाही मला नव्हती. आम्हा दोघा बहिणींना एकाच घरात दिल्यामुळे मानसिक आधार मिळत होता. लग्नानंतर लहान असल्यामुळे मला शाळेत जाण्यास कोणाचीच हरकत नव्हती.
    • रूपाला दहावीला ८४ टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर कुटुंबीयांनी मला डॉक्टर करायचे ठरवले. कुटुंबासाठीही मी पण हा विडा उचलला. (फोटो सौजन्य : india Today)
    • सध्या रूपा डॉक्टर होईन लोकांचा उपचार करत आहे. रूपा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रयत्नांना सलाम…

Web Title: Jaipur balika badhu married at 8 yr rupa yadav mbbs career success story nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.