-
करोना विषाणूचा सामना करण्यासाठी देशभराक १७ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आलेलं आहे. यापुढेही हे लॉकडाउन वाढण्याची शक्यता आहे. या काळात नेहमी घड्याळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबई शहरात आजकाल अशी भयाण शांतता पहायला मिळते. (छायाचित्र – अमित चक्रवर्ती)
-
मुंबईत प्रवास करायचा म्हटलं की रिक्षा या आल्याच….मात्र लॉकडाउन काळात सार्वजनिक वाहतुकीला बंदी असल्यामुळे या रिक्षाही रस्त्यावर आराम करत आहेत.
-
मुंबईत इतकी शांतता फार कमी अनुभवायला मिळते. रिक्षांच्या रांगेत चालणारा कुत्रा आरामासाठी जागा शोधत असावा का??
-
मुंबईतल्या प्रत्येक रस्त्यावर आजकाल करोनाविरुद्ध लढ्यात जनजागृती करणारी अशी चित्र पहायला मिळत आहे.
-
सकाळ असो वा दुपार…मुंबईचे रस्ते कधीही रिकामे नसायचे. मात्र करोनामुळे आजकाल रस्त्यावर मुश्किलीने एखादा माणूस पहायला मिळतो.
मुंबापुरीला करोनाचा ब्रेक
लॉकडाउनमध्ये रस्त्यांवर भयाण शांतता
Web Title: Mumbaikars embrace lock down for the 50th day in the wake of corona pandemic psd