-
करोना व्हायरसला रोखणारं औषध शोधून काढण्यासाठी अमेरिका, चीन, फ्रान्स, ब्रिटन, इटली, इस्रायल आणि भारत या देशांमध्ये मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे.
-
-
दरम्यान चीनमधल्या एका प्रयोगशाळेत करोना व्हायरसवर औषध विकसित करण्यात येत आहे.
-
-
मागच्यावर्षाच्या अखेरीस चीनच्या वुहान शहरातून करोना व्हायरसच्या साथीची सुरुवात झाली. लॉकडाउन हाच या आजाराला अटकाव करण्याचा एकमेव मार्ग आहे.
-
त्यामुळे जगाचे अर्थचक्र ठप्प झाले आहे. या व्हायरसवर प्रभावी औषध शोधून काढण्यासाठी मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे.
-
चीनच्या प्रयोगशाळेने बनवलेल्या या औषधाची प्रतिष्ठीत पेकिंग विद्यापीठामध्ये वैज्ञानिकांनी चाचणी घेतली.
-
संग्रहित छायाचित्र
-
प्राण्यांवरील चाचणीमध्ये हे औषध यशस्वी ठरले आहे असा दावा सनी शी यांनी केला आहे. ते बिजींग अॅडव्हान्स इनॉव्हेशन सेंटर फॉर जिनोमिसचे संचालक आहेत.
-
हे औषध मानवी रोगप्रतिकारक शक्तीपासून तयार होणाऱ्या अॅंटीबॉडीचा वापर करुन व्हायरसला पेशींवर हल्ला करण्यापासून रोखते.
-
जर्नल सेलमध्ये या संशोधनाची माहिती प्रसिद्ध झाली आहे. अॅंटीबॉडीचा शोध घेण्यासाठी आमची टीम दिवस-रात्र अथक मेहनत घेत होती असे सनी यांनी सांगितले.
-
वर्षअखेरीस हे औषध बाजारात उपलब्ध होईल असे त्यांनी सांगितले.
-
करोनानं जगभरात मृत्यूचं थैमान घातलं असून, भारतातही परिस्थिती चिंताजनक आहे. (संग्रहित छायाचित्र)
-
अमेरिकेतही मोडर्ना कंपनीने विकसित केलेल्या लसीची पहिली चाचणी यशस्वी ठरली आहे.
-
पहिल्या आठ जणांच्या चाचणीतून ही लस सुरक्षित आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
PHOTOS: लसीशिवाय करोनामुक्त करणारे औषध बनवल्याचा चिनी वैज्ञानिकांचा दावा
Web Title: Scientists in china believe new drug can stop pandemic without vaccine dmp