-
ताशी १९० किमी वेगानं धडकलेल्या अम्फन वादळानं पश्चिम बंगालची दैना उडवली आहे. (Photos : Santanu Chowdhury/Indian Express)
-
अवघ्या काही तासातच राजधानी कोलकातासह अनेक शहराचं चित्रच बदलून गेलं.
-
'अम्फन'च्या तडाख्यामुळे मालमत्तांचे प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. कोसळली आहे.
-
पश्चिम बंगालमधील दिघा व बांगलादेशातील हातिया येथे वादळाने बुधवारी दुपारी २.३० वाजता जमिनीला स्पर्श केला.
-
त्यानंतरच्या झंझावातात अनेक झाडे, घरे उन्मळून पडली असून विद्युत खांबही कोसळले आहेत.
-
या चक्रीवादळाने पश्चिम बंगाल व ओडिशामधील ७२ जणांचा बळी घेतला आहे.
-
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या वादळाला करोनापेक्षाही भयानक असल्याचे म्हटलं आहे.
-
ओडिशात २० पथके रस्ते मोकळे करण्याचे काम करीत असून पश्चिम बंगालमध्ये १९ पथके लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं.
-
अम्फनच्या तडाख्यामुळे अनेक शहरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
-
पश्चिम बंगालमधील २४ परगना या जिल्ह्याला वादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
हाहाकार! ‘अम्फन’नंतरचा पश्चिम बंगाल…
महाचक्रीवादळानंतरची दृश्ये
Web Title: Cyclone amphan leaves behind a trail of destruction in west bengal bmh