-
रेल्वेमध्ये कार्यरत असलेले आरपीएफ सहायक उपनिरीक्षक साजिद आणि त्यांच्या पत्नी पोलीस कर्मचारी शकीला शेख हे दोघेजण आपले कर्तव्य बजावून, दरररोज ‘फेस शिल्ड मास्क’ची निर्मिती करत आहेत. (सर्व फोटो- सागर कासार)
-
यामुळे रेल्वे विभागाकडून त्यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
-
दररोज कामावरून आल्यावर 150 पेक्षा अधिक अशा प्रकारचे मास्क ते तयार करतात.
-
आजपर्यंत त्यांनी कधीही अशा प्रकारचे काम केले नव्हते
-
अडचणी आल्या, पण काम सुरूच ठेवले.
-
कोणतेही चांगले काम करताना सुरूवातीला अडचणी येणार हा विचार डोक्यात होताच.
-
जवळ असलेले मास्क पाहून, नवीन मास्क तयार करण्यास सुरुवात केली.
-
आजपर्यंत आम्ही कधीही अशा प्रकारचे काम केले नव्हते. त्यामुळे आमच्यासमोर हे एक आव्हानच होते, असे त्यांनी सांगतिले.
-
शिलाई मशीन नसल्याने आता काम कसे करायचे? असा सुरूवातीस प्रश्न पडला होता.
-
लॉकडाउनमुळे मार्केट देखील बंद असल्याने नवीन मशीन घेणेही शक्य नव्हते.
-
सोसायटीमधील नागरिकांनी दोन मशीन दिल्याने अखेर कामास सुरुवात झाली
-
मास्क निर्मितीवेळी विविध प्रयोग केले, अखेर हे नवे फेस शिल्ड मास्क तयार झाले.
-
मास्क वापरताना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात आली.
-
मास्कवर डोळ्याच्यावरील बाजू पर्यंत जाईल असे प्लास्टिकचे कव्हर बसवले.
-
हे नवे फेस शिल्ड मास्क वरिष्ठांना दाखविल्यानंतर त्यांनी या मास्कचे कौतुक केले.
-
यापुढील काळात असेच मास्क तयार करण्यास त्यांनी सांगितले.
-
त्यानुसार या नव्या पद्धतीचे मास्क तयार केले जात आहे.
-
आता यापुढील काळात देखील आम्ही आधिकधिक मास्क तयार करणार असल्याचे दोघांनीही सांगितले.
-
करोना विरोधातील लढ्यासाठी आम्हाला वरिष्ठांनी हे काम करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही आभारी असल्याचे साजिद शेख यांनी सांगितले.
-
अशा प्रकाराचे मास्क तयार करताना आम्हाला एक वेगळा अनुभव आला असल्याचे शकीला शेख यांनी सांगितले.
PHOTOS : करोना योद्ध्यांकडून अनोख्या पद्धतीने ‘फेस शिल्ड मास्क’ची निर्मिती
रेल्वे पोलीस दलात कार्यरत असलेल्या शेख दाम्पत्याच्या कार्याचे वरिष्ठांकडून कौतूक
Web Title: Photos creation of face shield mask in a unique way by corona warriors msr