-
लॉकडाउन सुरू झाल्यापासून बंद असलेली पुण्याच्या प्रसिद्ध तुळशीबागेतील दुकानं आज उघडल्याचे दिसून आले. (सर्व फोटो- सागर कासार)
-
करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तुळशी बागेतील जवळपास 600 दुकाने मागील तीन महिन्यापासून बंद होती.
-
मात्र आता लॉकडाउन शिथील करण्यात आला. त्या दृष्टीने दोन दिवसांपूर्वी अधिकारी आणि येथील दुकानदारां मार्फत सर्व्हे करण्यात आला होता. त्यावेळी येथील सर्व माहिती देण्यात आली होती.
-
दुकाने लवकर सुरू करण्याबाबत महापालिका प्रशासना मार्फत निर्णय देतील, असे वाटत होते. मात्र शनिवारी प्रशासनाची बैठक आणि रविवारी सुट्टी असल्याने निर्णय होऊ शकला नाही. त्यावर आज दुपारी निर्णय होण्याची शक्यता आहे.
-
या ठिकाणी स्वस्त दरात विविध वस्तू मिळत असल्याने इथे नेहमी वर्दळ असते.
-
काही वेळाने ही दुकाने बंद होतील. महापालिकेच्या निर्णय नंतर, पुढील निर्णय घेतला जाईल , असे तुळशी बाग व्यापारी असोसिएशन नितीन पंडित यांनी सांगितले.
-
दरम्यान, तुळशीबागेतील दुकानं उघडल्याचे समजताच काहींनी खरेदीसाठी या ठिकाणी हजेरीही लावली होती.
-
तुळशीबाग ही विशेषकरून महिलांचे खरेदासाठीचे आवडते ठिकाण आहे.
-
तुळशीबागेतली दुकानं सुरू झाल्याचे समजताच अनेकजण या ठिकाणी खरेदीसाठी आल्याचे दिसून आले.
पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबागेतील दुकानं उघडली!
तुळशीबागेतली दुकानं सुरू झाल्याचे समजताच अनेक महिला व मुलीं या ठिकाणी खरेदीसाठी आल्याचे दिसून आले.
Web Title: Shops open at famous tulshibag pune msr 87 svk