• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. cyclone nisarga approaches on maharashtra border bmh

महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर ‘निसर्ग’ संकट

राज्यात एनडीआरएफची दहा पथक तैनात

June 2, 2020 17:23 IST
Follow Us
  • हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर ३ जून रोजी मोठं चक्रीवादळ धडकणार आहे. यासाठी राज्यातील सर्व यंत्रणा सज्ज असून, जीवितहानी टाळण्यासाठी नागरिकांनी समुद्र किनाऱ्यापासून दूर राहण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे. (फोटो :भारतीय हवामान विभाग)
    1/10

    हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर ३ जून रोजी मोठं चक्रीवादळ धडकणार आहे. यासाठी राज्यातील सर्व यंत्रणा सज्ज असून, जीवितहानी टाळण्यासाठी नागरिकांनी समुद्र किनाऱ्यापासून दूर राहण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे. (फोटो :भारतीय हवामान विभाग)

  • 2/10

    महाराष्ट्र आणि गुजरातचा किनारट्टीला निसर्ग चक्रीवादळ धडकणार आहे. या चक्रीवादळामुळे मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये उद्या (३ जून २०२०) काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (फोटो :भारतीय हवामान विभाग)

  • 3/10

    अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच पुढील २४ तासांत चक्रीवादळची तीव्रता देखील वाढणार आहे. (फोटो :भारतीय हवामान विभाग)

  • 4/10

    मुंबईलाही हे वादळ धडकणार असून, त्यादृष्टीनं मुंबई महापालिका व जिल्हा प्रशासनानं तयारी केली आहे. या वादळामुळे मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे. (फोटो : मुंबई महापालिका)

  • 5/10

    मुंबई महापालिकेनं या वादळाविषयी लोकांना सजग करणारी माहिती प्रसिद्ध केली आहे. (फोटो : मुंबई महापालिका)

  • 6/10

    या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्यात एनडीआरएफचे १० पथकं तैनात करण्यात आली आहे. तर गुजरातमध्ये ११ पथक आहेत. गुजरातने आणखी ५ पथक पाठवण्याची मागणी केली आहे. (फोटो : मुंबई महापालिका)

  • 7/10

    मुंबईसह उपनगरात निसर्ग चक्रीवादळामुळे रेड अलर्ट जारी केला आहे. या चक्रीवादळाला बांगलादेशने निसर्ग असे नाव दिले आहे. (फोटो : मुंबई महापालिका)

  • 8/10

    उत्तर हिंद महासागरामध्ये निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांच्या नावांची नवी यादी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गेल्या महिन्यात प्रसिद्ध केली होती.(फोटो : नासा)

  • 9/10

    या यादीमध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरालगतच्या देशांनी सुचवलेल्या नावांचा समावेश कऱण्यात आला होता. अरबी समुद्रातील आगामी चक्रीवादळापासून या नव्या यादीतील पहिलं नाव निसर्ग आहे. जे बांगलादेशने सुचवले आहे. (इंडियन एक्स्प्रेस))

  • 10/10

    २००४ मध्ये ६४ नावाची यादी तयार केली होती. गेल्या आठवड्यात आलेल्या अम्फान चक्रीवादळाला या यादीतील अखेरचं नाव दिलं आहे. त्यानंतर आता नव्या यादीतील पहिलं नाव तीन तारखेला धडकणाऱ्या चक्रीवादळाला देण्यात आलं आहे. (फोटो : एएनआय)

Web Title: Cyclone nisarga approaches on maharashtra border bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.