-
रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवरील भागात निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव दिसू लागला आहे. (सर्व फोटो – हर्षद कशाळकर)
-
श्रीवर्धन, मुरुड आणि अलिबाग तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाने हजेरी लावली.
-
अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. तर वीज पुरवठा खंडीत झाला आहे.
-
पोलादपूर जोगेश्वरी गाडीतळ भागात पत्र्याचे अखंड छप्पर रस्त्यावर आले
-
मुरुड येथे तहसील कार्यालयावर, अलिबाग येथे नियोजन भवना शेजारी महाकाय वृक्ष उन्मळून पडले.
-
मुरुड, श्रीवर्धन मध्येही पडझडीच्या घटना घडल्या. काही इमारतींवरील पत्रे उडून गेले. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही.
-
-
वादळाचा प्रभाव श्रीवर्धन आणि मुरुड तालुक्यात जास्त असल्याने, अलिबाग येथील एनडीआरएफच्या दोन टिम मुरुडकडे रवाना करण्यात आल्या.
-
जिल्ह्यात १३ हजार ५४१ जणांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आलं आहे.
-
नागरिकांना घरातच राहण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. वीज पुरवठा खंडीत झाला असला तरी दुरसंचार यंत्रणा सुरु आहेत.
-
आरसीएफ कॉलनीत पडलेलं झाड
-
-
अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन आणि उरण या चार सागरी तालुक्यांना वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे
-
जिल्ह्यात २४ तासांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे
रायगडमध्ये ‘निसर्ग’चं रौद्ररुप, झाडे उन्मळून पडली; वीज पुरवठा खंडीत
रायगडच्या किनारपट्टीवरील भागात वादळी पावसाला सुरवात
Web Title: Cyclone nisarga in alibaug raigad sgy